Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत २२ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईत २२ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महानगरपालिकेने १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८०० मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील ३०० मिलिमीटर, ६०० मिलिमीटर व ९०० मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत (एकूण २२ तास) सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत महानगरपालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी जुनी आणि नवीन तानसा जलवाहिनी तसेच विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील एकूण पाच झडपा (चार बटरफ्लाय झडप आणि १ स्लुईस झडप) बदण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ते काम शुक्रवारी सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी त्या कालावधीत पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच पुरेसा साठा करावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा कुठे बंद?

एन विभाग : राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ. एन. जी. सी. वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर. एन. गांधी मार्ग (१५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ मिनिटांपासून सकाळी ८ वाजेपर्यंत) एल विभाग – न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर (दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत)

एम पश्चिम विभाग : टिळक नगर, टिळक नगर स्थानक रस्ता, पेस्टम सागर रस्ता क्रमांक १ ते ६, ठक्कर बाप्पा वसाहत पाडा क्रमांक १ ते ४, शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस. जी. बर्वे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम बाजूकडील सेवा मार्ग (प्रगती सोसायटी), गोदरेज वसाहत, यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत, एम. एम. आर. डी. ए. एस. आर. ए. वसाहत (दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत) एफ उत्तर विभाग – शीव (सायन) पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाउंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा विल्डिंग्ज (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगरचा काही भाग, गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा, भीमवाडी येथील प्रवेशद्वार क्रमांक ४ आणि ५. (दिनांक १५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.४५ मिनिटांपासून सकाळी ८ वाजेपर्यंत)

Previous Post

प्रसिद्ध जपानी अभिनेता तात्सुया नाकादाई यांचे निधन!

Next Post

विना नोंदणी कार्य करणाऱ्या दिव्यांग संस्थांवर कारवाई होणार, ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश

Next Post
विना नोंदणी कार्य करणाऱ्या दिव्यांग संस्थांवर कारवाई होणार, ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश

विना नोंदणी कार्य करणाऱ्या दिव्यांग संस्थांवर कारवाई होणार, ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आदेश

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.