Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

बिग बॉस १९: सलमान खानने दाखवला फरहाना भट्टला बाहेरचा रस्ता

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 8, 2025
in मनोरंजन
बिग बॉस १९: सलमान खानने दाखवला फरहाना भट्टला बाहेरचा रस्ता
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ‘बिग बॉस’च्या शोमध्ये होणारी भांडणं आणि वाद काही नवीन नाहीत. ‘बिग बॉस’च्या दर आठवड्यात स्पर्धक एकमेकांबरोबर भांडतात आणि या भांडणात ते अनेकदा एकमेकांचा अपमान करतात. एकमेकांबद्दल अपशब्द वापरतात. या सगळ्याची शाळा सलमान दर शनिवार आणि रविवारी ‘वीकेंड का वार’च्या भागात घेतो. चूक केलेल्या स्पर्धकांचे कान टोचतो. अशातच आज होणाऱ्या ‘वीकेंड का वार’च्या भागात सलमान खान फरहाना भट्टची शाळा घेणार आहे. फरहानानं गुरुवारच्या भागात टास्कदरम्यान गौरव खन्नाबद्दल अपमानास्पद टीका केली होती. तसंच तिनं त्याच्या आजवरच्या टेलिव्हिजन क्षेत्रातल्या करिअरवर टिप्पणी केली होती. स्वत:ला टीव्हीचा स्टार समजणाऱ्या गौरवला कोणीच ओळखत नाही असं म्हटलं होतं. यावर सलमान त्याच्या स्टाइलमध्ये फरहानाचा समाचार घेणार आहे.

आज होणाऱ्या ‘वीकेंड का वार’चा प्रोमो समोर आला आहे, ज्यात सलमान फरहानावर ओरडताना दिसत आहे. तिला खडेबोल सुनावत आहे. फरहानाने वापरलेल्या शब्दांमुळे सलमान खान पुन्हा एकदा तिच्यासमोर ‘फरहाना अपशब्द कोश’ नावाची एक खास डिक्शनरी घेऊन येतो. यात फरहानाने शोमध्ये वापरलेले सगळे अपमानास्पद शब्द लिहिलेले आहेत. सलमान स्वतः हे शब्द मोठ्याने वाचून फरहानाला ऐकवतो. सलमान म्हणतो, “फरहाना, तू काय बोललीस माहिती आहे का? ‘बी-ग्रेड लोक’… ‘गंदी नाली का कीडा’… ‘गवार’… हे सगळं तू एका नॅशनल टीव्हीवर बोललीस!” यानंतर सलमाननं फरहानाने टीव्ही इंडस्ट्रीवर केलेल्या टिप्पणीबद्दलही नाराजी व्यक्त करत म्हटलं, “तू म्हणालीस की टीव्ही तुझ्या लेव्हलच्या खाली आहे? टीव्हीची औकात नाही की तू त्यावर दिसावं? मला हे ऐकून लाज वाटली.”

Previous Post

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना रद्द?

Next Post

कोथरुडमधील फसवणूकप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना ठोकल्या बेड्या

Next Post
कोथरुडमधील फसवणूकप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना ठोकल्या बेड्या

कोथरुडमधील फसवणूकप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना ठोकल्या बेड्या

BreakingNews

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

चेन्नईचा मुंबईवर १०३ धावांनी दणदणीत विजय

आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाईल रिचार्ज; भारतात नवीन फीचरची सुरुवात

ठाणे सॅटीस पुलावर शिवशाही बसला आग; २० प्रवाशांचे थरारक बचाव!

गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.