Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 5, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नावाच्या बाबतीत कुणालाही आदेश देणं, हे आपल्या अधिकारात येत नसल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी याचिकेच्या सुनावणीदरम्यान केली. या विमानळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्रालयाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावलीय. संविधानाच्या कलम २२६ अंतर्गत अधिकार वापरत न्यायालयालाही राज्य सरकारनं मांडलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा कोणताही अधिकार नाही. कायदेशीर भाषेनुसार, प्रस्ताव हा केवळ हेतूची अभिव्यक्ती आहे. त्याचा निर्णय व्यापक नियम आणि वैधानिक तरतुदींनुसारच घेतला जाऊ शकतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुनावणीदरम्यान म्हटलं.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून भविष्यात या परिसरात अशांतता पसरू नये, यासाठी आदरणीय आणि प्रभावशाली लोकनेते दि.बा. पाटील यांचंच नाव या विमानतळाला देण्यात यावं, अशी मागणी करत प्रकाशज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीनं हायकोर्टाला सांगण्यात आलं की, विमानतळाच्या नामांतराचा वाद हा गेली अनेक वर्षे सुरू आहे. दि.बा. पाटील यांच्याशी स्थानिक लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांची मागणी लक्षात घेता हायकोर्टानं लोकनेते दि. बा. पाटील यांचंच नाव या विमानतळाला देण्याचे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतुक मंत्रालयाला द्यावेत, अश विनंती हायकोर्टाकडे करण्यात आली. मात्र, हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत ही याचिका फेटाळून लावली.

Previous Post

नवी मुंबईत खळबळ; बनावट पत्रकारांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार!

Next Post

मुंबईत मानवतेला काळिमा; १ महिन्याचे बाळ कचऱ्यात!

Next Post
मुंबईत मानवतेला काळिमा; १ महिन्याचे बाळ कचऱ्यात!

मुंबईत मानवतेला काळिमा; १ महिन्याचे बाळ कचऱ्यात!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.