Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नवी मुंबईत खळबळ; बनावट पत्रकारांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 5, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
नवी मुंबईत खळबळ; बनावट पत्रकारांच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : शहरात बनावट सोशल मीडिया पत्रकारांचा दहशतवादी कारभार वाढू लागला असून इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर खोट्या नावाने पत्रकारिता करण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. काही व्यक्ती प्रतिष्ठित न्यूज चॅनलच्या नावासारखी पेजेस व चॅनेल्स तयार करून स्वतःला पत्रकार म्हणवून घेत आहेत आणि बार, लेडीज बार तसेच नाईट क्लबमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करून पैसे उकळत आहेत.हे बोगस पत्रकार पोलीस ओळखीचा धाक दाखवून बार मालक व ग्राहकांकडून पैशांची उघड मागणी करतात. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याच्या, किंवा चॅनेलवर टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेच्या नावाला या तोतया पत्रकारांनी तडा दिला आहे. प्रतिष्ठित मीडिया चॅनलची नावे पुढे एखादा शब्द जोडून नवीन अकाउंटस तयार केली जातात आणि या ‘विश्वसनीय’ वाटणाऱ्या नावांच्या आडून फसवणूक केली जाते. तथाकथित हे मोबाइल पत्रकार इतरांकडून व्हायरल झालेले व्हिडिओ डाउनलोड करून त्यावर स्वतःचा चॅनल लोगो लावतात व स्टिंग ऑपरेशनच्या नावाने पैसे मागतात. पैसे न मिळाल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली जाते. रात्रीच्या वेळी असे प्रकार अधिक होत असल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही प्रकरणांमध्ये तर हे बनावट पत्रकार पोलीसांची वर्दी घालूनही ठिकाणी पोहोचतात, तपासणीच्या नावाखाली उपस्थित ग्राहकांना घाबरवतात आणि त्यामुळे बारमालकांना सामाजिक तसेच आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ग्राहकांचा व्हिडिओ पसरवण्याच्या धमक्या देऊन मानसिक छळ केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.दरम्यान, या प्रकरणांमुळे पोलिसांच्याही प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सायबर सेलमार्फत बनावट सोशल मीडिया आयडी शोधून कठोर कारवाईची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. नियमांचा भंग करणाऱ्या काही बारांवर कारवाई होणे आवश्यक असले तरी, पत्रकार नावाचा वापर करून ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळ्यांवर तातडीने अंकुश लावण्याची मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे. नवी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेऊन पुढील कारवाई कधी होते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Previous Post

उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता

Next Post

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

Next Post
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.