Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरचे “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 30, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरचे “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा…’ या चित्रपटाचं टायटल साँग चित्रपटाच्या निर्मात्यांनी लाँच केले आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारं हे गाणं असून, दोन दमदार गाण्यांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा… ” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट लास्ट स्टॉप खांदा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातलं ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं या पूर्वीच लोकप्रिय झालं आहे. त्याशिवाय चित्रपटाच्या टिझरला सोशल मीडियातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं आहे. या गाण्याला अतिशय साधेसोपे शब्द, उडती चाल, प्रत्येकाला थिरकायला लावणाऱ्या ठेक्याची जोड मिळाली आहे. श्रेयस राज आंगणे याने लिहिलेल्या या टायटल सॉंगला सुहास सावंत यांचा स्वरसाज लाभला असून संगीत श्रेयस राज आंगणे यांचे आहे, तर नृत्यदिग्दर्शन राहुल बनसोडे, रवी आखाडे यांचे आहे. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश करपेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद हे संपूर्ण कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. मनोरंजक कथानक, उत्तम अभिनेते असलेल्या या चित्रपटाविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

Previous Post

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम माधवी निमकरनं मुंबईत घेतलं दुसरं घर

Next Post

“ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस…”, महेश मांजरेकर यांच्याबद्दल सिद्धार्थ जाधवचे वक्तव्य

Next Post
“ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस…”, महेश मांजरेकर यांच्याबद्दल सिद्धार्थ जाधवचे वक्तव्य

“ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस…”, महेश मांजरेकर यांच्याबद्दल सिद्धार्थ जाधवचे वक्तव्य

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.