Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

गायक दिलजीत दोसांझला खालिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2025
in मनोरंजन
गायक दिलजीत दोसांझला खालिस्तानी दहशतवाद्यांकडून धमकी
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या भारतविरोधी संघटनेने – सिख्स फॉर जस्टिस (SFJ) ने १ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा गायक दिलजीत दोसांझचा कार्यक्रम बंद पडण्याची धमकी दिली आहे. धमकी देताना एसएफजेने म्हंटले की, ‘बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे चरण स्पर्श करून दिलजीतने १९८४ च्या शीख नरसंहारातील प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केला आहे.

गायक दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमावर बंदी घालणाऱ्या संघटनेने आरोप केला होता की,  बिग बी यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी ‘खून के बदले खून’ या नरसंहाराच्या घोषणेसह भारतीय जमावाला सार्वजनिकपणे भडकावले होते. या घोषणे संदर्भात असा दावा करण्यात आला होता की यामुळे लोक भडकले आणि भारतातील जवळपास ३०,००० शीख पुरुष, महिला आणि लहान मुलं मारली गेली. दहशतवादी पन्नूने निवेदनात म्हटले की, ‘ज्यांच्या शब्दांनी नरसंहाराचा कट रचला होता, त्यांच्या पायांना स्पर्श करून गायक दिलजीत दोसांझने १९८४ च्या शीख नरसंहारातील प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केला आहे’. दिलजीत काही दिवसांपूर्वी केबीसीच्या मंचावर गेला होता. यावेळी त्याने आदर म्हणून अमिताभ बच्चन यांचे चरणस्पर्श केले होते. योगायोगाने, अकाल तख्त साहिबने १ नोव्हेंबर हा दिवस “शीख नरसंहार स्मृतिदिन” म्हणून घोषित केला आहे. या धमकीवर दिलजीतने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Previous Post

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला गोव्यातून अटक

Next Post

गुंतवणुकीच्या आमिषाने कल्याणमधील गृहिणी महिलेची कोटींची फसवणूक

Next Post
गुंतवणुकीच्या आमिषाने कल्याणमधील गृहिणी महिलेची कोटींची फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने कल्याणमधील गृहिणी महिलेची कोटींची फसवणूक

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.