Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे शहरातील उपवन तलावाजवळ विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीचे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांचे हरिकीर्तन होणार आहे. त्यामुळे उपवन तलाव परिसरात विशेष सोहळा अनुभवता येणार आहे.

ठाणे शहरातील उपवन तलाव हा एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध तलाव आहे. उपवन तलाव आणि बाजूला असलेला येऊरचा हिरवागार डोंगर असे मनमोहक दृश्य ठाणेकरांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे. त्यामुळे या तलावाच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी अनेक लोक फिरायला, धावायला व व्यायामासाठी येतात. याठिकाणी स्वच्छ पायवाटा, बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि प्रकाशयोजना यामुळे फिरण्यासाठी अत्यंत मनमोहक वातावरण तयार होते. तसेच तलावाच्या पाण्यावर नुकताच सुरु केलेला ‘लेझर शो’ येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. आता, त्यासह याठिकाणी विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाची निर्मिती करण्यात आली होती.आता, त्यांच्याच पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर घाटावर ही विठ्ठलमूर्ती साकारण्यात आली आहे. कोल्हापूरचे शिल्पकार सतिश घार्गे यांनी ५१ फूट उंच विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे. या मूर्तीच्या सभोवती दगडी दीपमाळही उभारण्यात आल्या आहेत. येत्या शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे. तसेच सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांचे लोकार्पणाच्या निमित्ताने हरिकीर्तन होणार आहे.

Previous Post

बिग बॉस १९ : शाहबाजला टक्कर देऊन प्रणित मोरे बनला नवा कॅप्टन!

Next Post

कर्णधार रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

Next Post
कर्णधार रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

कर्णधार रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.