वृत्तसंस्था : आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी विनिंग शॉट मारत चर्चेत आलेला क्रिकेटपटू रिंकू सिंग आता एका गंभीर प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. रिंकू सिंगकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून, ही धमकी थेट अंडरवर्ल्ड डॉन डी-कंपनीकडून आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिस तपासानुसार, आरोपींपैकी एकाने चौकशीत रिंकू सिंगकडून खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे. अलीकडेच पाकिस्तानविरुद्धच्या एशिया कप फायनलमध्ये रिंकू सिंगने टीम इंडियासाठी जिंकवून देणारा फटका मारला होता. त्या कामगिरीनंतर तो चर्चेत आला होता, पण आता तो अंडरवर्ल्डकडून आलेल्या धमकीमुळे चर्चेत आहे.