वृत्तसंस्था : ‘बिग बॉस १९’ च्या घरात ‘वीकेंड का वार’मध्ये नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची बहीण बिग बॉसच्या घरात आली आहे. मालती चाहरच्या ‘बिग बॉस १९’मधील एन्ट्रीने घरातील काही सदस्यांना चांगलाच धक्का बसला आहे. घरात प्रवेश केल्यानंतर मालतीने प्रथम तान्या मित्तलला टार्गेट केले. ती अनेकदा घरातील सदस्यांना तान्याविरुद्ध भडकवताना, तिच्याबद्दल बोलताना दिसली.
घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून मालती ‘बिग बॉस १९’मध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मालती चाहरच्या बिग बॉसमधील एन्ट्रीनंतर प्रेक्षकांची संमिश्र मते येऊ लागली आहेत. बिग बॉस या शोची माहिती देणारे सोशल मीडियावर अनेक पेज आहेत. ज्यात प्रेक्षक आपली मते देतात. एकीकडे नेटकरी मालतीचा गेम प्लान सांगत आहे. तर दुसरीकडे तिचे कौतुक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांच्या मते मालती चाहर बिग बॉसच्या घरात राडा घालणार आहे. “पहिल्या एपिसोडमध्ये तान्या मित्तलचा पर्दाफाश”, “ही मुलगी शोमध्ये धुमाकूळ घालणार”, “मालतीच्या येण्याने तान्या अस्वस्थ” अशा अनेक कमेंट्स येत आहेत.