Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

उत्सवाच्या काळात बनावट चलन बदली करणारी टोळी गजाआड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 3, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
उत्सवाच्या काळात बनावट चलन बदली करणारी टोळी गजाआड
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : दसरा आणि दिवाळीमध्ये नागरिक मोठ्याप्रमाणात खरेदी करतात. याचा गैरफादा घेऊन बनावट चलन बाजारात विविध माध्यमातून आणले जाते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने बनावट चलन बदली करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. शिवानंद कोळी (२४) आणि राहुल शेजवळ (२४) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ५०० रुपये दराचे बनावट चलन, एक पिस्तुल, काडतुस, मोटार असा ६ लाख ३३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सण उत्सवांमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक जातात. साहित्य खरेदीसाठी रोख व्यवहार होतात. गर्दीचा गैरफायदा घेऊन अनेकदा बनावट चलन देखील बाजारात आणले जाते. भिवंडी येथील मिल्लतनगर परिसरात बनावट चलन बदलीसाठी दोघे येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून चाविंद्रा येथे एका मोटारीतून शिवानंद कोळी आणि राहुल शेजवळ हे जात होते. पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, दोघेही नाशिक येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्या मोटारीमध्ये तपासणी केली असता, बनावट ५०० रुपये दराचे बनावट चलनाचे ४८ बंडल, पिस्तुल, एक काडतुस आढळून आले. त्यांच्याविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी चलन बदली करण्याच्या अमीषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

ठाणे पोलिसांची कामगिरी; महिलांच्या रेल्वे डब्यात दागिने चोरी करणाऱ्या महिलेला अटक

Next Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील ह्यांचे नाव देण्यासाठी मोर्चा, केंद्र सरकारला खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

Next Post
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील ह्यांचे नाव देण्यासाठी मोर्चा, केंद्र सरकारला खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील ह्यांचे नाव देण्यासाठी मोर्चा, केंद्र सरकारला खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.