वृत्तसंस्था : ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक डिजिटल सेवा सुरु होणार आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे एटीएममधून काढता येणार आहेत. याची प्रोसेस मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, आता कर्मचाऱ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफओची ही सेवा जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे.
ईपीएफओमधून आता एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहे. जूनमध्येच ही सेवा सुरु होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा अजूनही सुरु झाली नाही. दरम्यान, २०२६ च्या सुरुवातीलाच ही सेवा सुरु केली जाईल, असं सांगण्यात येत आहे. याआधी ईपीएफओ कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन ऑफलाइन अर्ज करावा लागायचा. यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे जमा होण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागायची. मात्र, आता सरकारच्या या निर्णर्यामुळे अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढता येणार आहे.