नवी दिल्ली : मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकजण मेट्रोत रिल्स बनवतात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी हे व्हिडिओ पोस्ट करतात. दरम्यान, आता मेट्रोने महत्त्वाचा निर्णय आहे. आता मेट्रोत रिल्स बनवण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोने यासंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली मेट्रोत आता कोणत्याही प्रकारचे रिल्स, व्हिडिओ शूट करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर तुम्ही व्हिडिओ शूट केले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हा नियम १४ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या शेवटपर्यंत हा नियम प्रत्यक्षात मेट्रोत लागू करण्यात येणार आहे.
DMRCच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रधान कार्यकारी संचालक अनुल दयाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. व्हिडिओ शूट करण्याऱ्यांमुळे प्रवाशांनी गैरसोय होऊ नये, यासाठी खात्री घेतली जाईल. याशिवाय दिल्ली मेट्रोने एक सोशल मिडिया मोहिम सुरु केली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना सांगितले जाणार आहे की, मेट्रोमध्ये मोठ्या आवाजात कोणतीही गाणी ऐकू नये. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल. गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोत रिल्स बनवण्याच्या ट्रेंड सुरु आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवणे हे चांगले नाही. यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ शकतो. मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या आवाजामुळे त्रास होईल. त्यामुळेच दिल्ली मेट्रोने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.