Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

सीमाशुल्क अधीक्षकाला केली सीबीआयने १० लाखांची लाच घेताना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 4, 2025
in Uncategorized, गुन्हेगारी, मुंबई
सीमाशुल्क अधीक्षकाला केली सीबीआयने १० लाखांची लाच घेताना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सहार विमानतळावर कार्यरत असलेल्या एका सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधीक्षकाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १० लाखांची लाच घेताना अटक केली आहे.सीबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सीमा शुल्क विभागाचे (कस्टम) अधीक्षक श्रीकृष्ण कुमार सहार विमानतळाच्या हवाई कार्गो विभाग कार्यरत होता. त्याने एका कस्टम हाऊस कंपनीकडून आयात केलेल्या मालाला मंजुरी (क्लिअरन्स) देण्यासाठी आयात मालाच्या वजनानुसार दर किलोमागे १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

ही लाच त्याने स्वतःसाठी तसेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावतीने मागितल्याचा आरोप आहे. कंपनीने लाच देण्यास नकार दिल्यावर संबंधित अधिक्षकाने धमकी दिली आणि माल मुद्दाम रोखून धरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार करण्यात आली होती. सीबीआयने २५ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी केली. त्यात अधीक्षक श्रीकृष्ण कुमार याने याआधी मंजूर (क्लिअर) झालेल्या मालासाठी ६ लाख तर नव्या मालाच्या क्लिअरन्ससाठी १० लाखांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. शनिवार २ ऑगस्ट रोजी सीबीआयने सापळा रचून अधीक्षक श्रीकृष्ण कुमार याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १० लाख २० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी श्रीकृष्ण कुमार याला न्यायालयात हजर करण्यात आले असून ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

सोलापूर हादरले, सावत्र आईने केली ३ वर्षाच्या चिमुकलीची हत्या

Next Post

BMC has shut down Dadar Kabutarkhana

Next Post
BMC has shut down Dadar Kabutarkhana

BMC has shut down Dadar Kabutarkhana

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.