Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

“आता तुम्ही सर्व मरणार..”, कुर्लामधील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 24, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
“आता तुम्ही सर्व मरणार..”, कुर्लामधील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : शहरातील शाळांना धमकीचे ई-मेल येण्याचे सत्र सुरूच असून अलिकडेच कुर्ला येथील आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने शाळेच्या परिसरात अनेक बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. शाळा प्रशासनाने धमकीच्या या ई-मेलबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातील पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेऊन शाळेची तपासणी केली. पण तेथे काहीच संशयास्पद सापडले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा ई-मेल मंगळवारी दुपारी शाळेला प्राप्त झाला होता. पण बुधवारी सकाळी हा ई-मेल शाळेच्या मुख्याध्यापकांनी पाहिला. आरोपीने ई-मेलमध्ये धमकी दिली होती. तसेच इ-मेलमध्ये अत्यंत शेलक्या भाषेचा वापर करण्यात आला होता. बॉम्बमध्ये शक्तीशाली स्फोटकांचा वापर करण्यात आला असून एकाहून अधिक बॉम्ब शाळा परिसरात पेरण्यात आल्याचे ई-मेलमध्ये नमुद करण्यात आले होते. ‘आता तुम्ही सर्व मरणार आहात. सर्वांचा मृत्यू अटळ आहे’, असे धमकावण्यात आले होते. या कृत्याची जबाबदारी रोडकिल आणि सायलेन्स ही संघटना घेत असल्याही त्यात लिहिण्यात आले होते. तसेच धमकावण्यासाठी अत्यंत्य शेलक्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. या मागे खोडसाळपणा असल्याचा संशय पोलिसांना आहे. पण तक्रारीनंतर याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही याप्रकरणी सखोल तपास करीत आहे. सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. तसेच आयपी ॲड्रेसद्वारे पोलीस ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. शाळेच्या परिसरात कोणताही स्फोटक पदार्थ आढळलेला नसला, तरी पोलिसांनी ही धमकीला गांभीर्याने घेतली सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Previous Post

‘टेस्ला’ शो रुमचे नाव मराठी की हिन्दी? मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त

Next Post

मुंबईत पहाटेपासून पावसाने धरला जोर; २-३ दिवस पाऊस सक्रिय, हवामान विभागाचा अंदाज

Next Post
मुंबईत पहाटेपासून पावसाने धरला जोर; २-३ दिवस पाऊस सक्रिय, हवामान विभागाचा अंदाज

मुंबईत पहाटेपासून पावसाने धरला जोर; २-३ दिवस पाऊस सक्रिय, हवामान विभागाचा अंदाज

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.