Lokrakshanay
Friday, August 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

१० पट पैसे देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, खेळण्याचे पैसे देऊन आरोपी फरार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 14, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
१० पट पैसे देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक, खेळण्याचे पैसे देऊन आरोपी फरार
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ५० हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन भामट्यांनी एका महिलेची फसवणूक केली. त्या महिलेला लहान मुलांच्या खेळण्यातील पैसे देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, जादा पैशांसाठी तिने दागिने विकून त्या भामट्यांना पैसे गोळाकरून दिले होते. फसवणुक झालेली ४५ वर्षीय महिला बदलापूरमध्ये राहते. ती घरकाम करते, तर तिचा मुलगा एका कंपनीत कामाला आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. महिला इन्स्टाग्राम हे ॲप वापरित असताना एक जाहीरात तिला दिसली. त्यामध्ये ५० हजार द्या, आम्ही पाच लाख रुपये करुन देतो असे लिहीण्यात आले होते. तसेच, त्याखाली मोबाईल क्रमांक देण्यात आले होते. महिलेने त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्या भामट्यांनी तिला जादा मोबदला देतो असे सांगितले. त्यामुळे तिने त्या भामट्यांना पैसे देण्याचे ठरविले.

११ जुलैला तिने सोन्याचे दागिने सराफाकडे गहाण ठेऊन ३० हजार रुपये घेतले. तसेच १० हजार रुपये मुलाच्या वेतनातील घेतले. असे एकूण ४० हजार रुपये जमा झाल्यानंतर तिने त्या भामट्यांना संपर्क साधला. त्या भामट्यांनी तिला १२ जुलैला पैसे घेऊन ठाणे रेल्वे स्थानक येथे बोलावले. महिला ठाणे रेल्वे स्थानकात आली असता, सुरुवातीला त्यांनी तिला ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला उभे राहण्यास सांगितले. एक तास ताटकळत ठेवल्यानंतर तिला पुन्हा ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील गावदेवी मंदिराजवळ बोलाविले. महिला गावदेवी मंदिराच्या येथे पायी जात असताना एका दुचाकीवर दोघे आले. यातील दोघांनी डोक्यात हेल्मेट घातले होते आणि तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांनी महिलेकडून ४० हजार रुपये घेतले. तसेच तिच्या हातात कागदाने बंदिस्त केलेले एक बंडल दिले. यामध्ये पैसे असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. काही वेळाने त्यांनी महिलेला पुन्हा मोबाईलवर संपर्क साधला आणि पैशांचे बंडल घरी गेल्यानंतर उघडण्यास सांगितले. तसे केले नाही तर पोलीस पकडतील अशी भिती तिला दाखविली. त्यामुळे महिलेने ते बंडल उघडले नाही. महिला घरी पोहचली असता, तिने पैशांचे बंडल उघडून पाहिले. त्यात खेळण्याचे पैसे असल्याचे उघड झाले. महिलेने याबाबतची माहिती मुलाला दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे, कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ चे कलम ३ (५), ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

बोळींज पोलिसांकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघड; १२ जणांना अटक

Next Post

गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही – मंगल प्रभात लोढा यांनी ग्वाही

Next Post
गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही – मंगल प्रभात लोढा यांनी ग्वाही

गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही - मंगल प्रभात लोढा यांनी ग्वाही

BreakingNews

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.