Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 11, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी गठीत युवा धोरण समितीची प्रथम बैठक संपन्न झाली. या नव्या धोरणात शिक्षण, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बौद्धिक व सामाजिक विकास तसेच राष्ट्रप्रेम, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांची जोपासना यावर विशेष भर दिला जाणार आहे.

विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल करताना, नव्या पिढीच्या गरजांनुसार धोरण तयार करणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागांतील युवकांना समान संधी मिळाव्यात, यासाठी प्रशिक्षण, सुविधा व योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार केले जाईल. या धोरणांतर्गत युवा प्रशिक्षण केंद्रे, वसतीगृहे, युवा निधी, पुरस्कार, महोत्सव, व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम तसेच युवा प्रतिष्ठा निर्देशांक यांचा समावेश करण्यात येणार आहे.

युवकांचे विचार आणि अपेक्षा समजून घेऊनच हे धोरण आखले गेले पाहिजे. यासाठी शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया, सेवा क्षेत्रातील प्रतिनिधी यांना सहभागी करून त्यांच्या सूचनांचा धोरणात समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच, युवक कल्याण विभागाबरोबरच इतर विभागांनीही संघटितपणे आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आ. प्रवीण दटके, आ. संतोष दानवे, आ. श्रीकांत भारतीय, आ. देवेंद्र कोठे, आ. सुहास कांदे, आ. राजेश पवार, आ. आशुतोष काळे, आ. प्रकाश सुर्वे, युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह तसेच राज्य व राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते उपस्थित होते.

Previous Post

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांगीण नियोजन!

Next Post

ब्रिटिश वारशाचा अंत, ‘सिंदूर’ उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत!

Next Post
ब्रिटिश वारशाचा अंत, ‘सिंदूर’ उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत!

ब्रिटिश वारशाचा अंत, 'सिंदूर' उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत!

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.