Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांगीण नियोजन!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 11, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांगीण नियोजन!
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमवेत हिंजवडी आय. टी. पार्क, पुणे येथील समस्यांबाबत बैठक संपन्न झाली.

पुण्यातील हिंजवडी आय. टी. पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरसदृश्य स्थिती निर्माण होणे, तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा विविध समस्या आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि एमआयडीसी यांनी योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनांचा वापर करून नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे, विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहद् आराखडा सादर करावा.

हिंजवडी आय. टी. पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आय. टी. अभियंते आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात या कोंडीत आणखी भर पडते. या भागात रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा आणि मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. कस्पटे वस्ती ते हिंजवडी फेज 3 पर्यंतचा रस्ता स्वतंत्र केल्यास वाहतुकीची गर्दी कमी होईल. सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सिटीचा प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रूंदीकरणासाठी योग्य मोबदला देऊन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन भूसंपादन करावे. हिंजवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम सहापदरी करून त्याबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा.

सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंगे ते हिंजवडी फेज 1, शनि मंदिर वाकड ते मरूंजी, नांदे ते माण या रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामांना संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडोरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे. गर्दी वाढल्याने नागरिक रस्त्यावर येणार नाहीत, यासाठी फूटपाथचा विषय दोन्ही महानगर पालिकांनी हाती घेऊन मार्गी लावावा. पाटील वस्ती ते बालेवाडी रोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे.

पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुढील वर्षापर्यंत अभ्यास करून योग्य प्रवाह होईल, असे नियोजन करावे. आवश्यक त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे हाती घ्यावीत. सर्व कामांसाठी विभागीय आयुक्तांनी समन्वय साधून बैठका घ्याव्यात, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष पीएमआरडीएचे आयुक्त यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. शंकर जगताप, आ. महेश लांडगे, आ. शंकर मांडेकर व संबंधित अधिकारी तसेच हिंजवडी येथील रहिवासी उपस्थित होते.

Previous Post

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी विषयाचे शिक्षण द्या, न्यायमूर्ती अभय ओक यांचे मत

Next Post

नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार

Next Post
नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार

नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार

BreakingNews

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.