Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर 31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 11, 2024
in ठाणे
कल्याण आरटीओ क्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर  31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे :- राज्याच्या परिवहन आयुक्तांनी महाराष्ट्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट – HSRP) बसविणे बंधनकारक करण्यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून वाहन चालकांनी 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबरप्लेट बसवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाने कल्याण उप प्रादेशिक कार्यालयासाठी मे. रियल माझोन इंडिया एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क निर्धारित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा, वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी या व अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवरील हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत.

राज्यात सन 2019 पासून नव्या उत्पादित वाहनांना HSRP नंबरप्लेट सक्तीची केली असून वाहनाला ही नंबरप्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली नंबरप्लेट टॅम्परप्रुफ असते. ही नंबरप्लेट अॅल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनविलेली असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम व वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत IND अशी अक्षरे लिहिलेली असतात.

हाय सिक्यूरिटी नंबरप्लेटचे महत्व लक्षात घेता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट (HSRP) नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून त्याकरीता परिवहन विभागाने या कार्यालयासाठी नियुक्त केलेल्या मे. रियल माझोन इंडिया एजन्सीकडून ही नंबरप्लेट बसवून घेता येईल. त्यासाठी दुचाकी आणि ट्रॅक्टर: रु.450/- (जीएसटी वगळून),     तीन चाकी: रु.500/- (जीएसटी वगळून), हलकी मोटार वाहने/ पॅसेंजर कार/ मिडियम कमर्शियल वाहन/ अवजड कमर्शियल वाहन आणि ट्रेलर/ कॉम्बिनेशन: रु.745/- (जीएसटी वगळून) हे शुल्क निर्धारित केले आहे.

नियुक्त केलेली एजन्सी आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात आपले फ्रँचायझी सुरु करुन वाहनांना नंबरप्लेट लावण्याचे काम करणार आहे. याबाबतची माहिती व निर्देश एचएसआरपी बुकिंग पोर्टल लिंक लवकरच महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.

परिवहन विभागाने दि.31 मार्च 2025 पर्यंत जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे अनिवार्य केले आहे. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडून एचएसआरपी नंबरप्लेट लावून मिळणार आहे, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.बारकुल यांनी कळविले आहे.

Previous Post

‘कलम ४९८ अ’चा महिलांकडून मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होत आहे – सर्वोच्च न्यायालय

Next Post

मुंबई पोलिसांची रिक्षा चालकांविरोधात विशेष मोहीम

Next Post
मुंबई पोलिसांची रिक्षा चालकांविरोधात विशेष मोहीम

मुंबई पोलिसांची रिक्षा चालकांविरोधात विशेष मोहीम

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.