Lokrakshanay
Sunday, May 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

‘मराठी माणसांना जागा नाकारणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा..’ मनसेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

"जे लोक भाषेच्या, धर्माच्या, जातीच्या आणि खाण्या पिण्याच्या बाबतीत भेदभाव करून जागा नाकारत असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘मराठी माणसांना जागा नाकारणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा..’ मनसेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. त्यातच आता मनसेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. मराठी माणसांना जागा नाकारणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कडक कायदा करा अशी मागणी त्यांनी केली आहे. 2016 मध्ये महापालिकेने यासंदर्भातील मंजूर केलेल्या प्रस्तावाचं नगर विकास विभागाने कायद्यात रूपांतर करावे अशी मनसेची मागणी आहे. शिवसदन या सोसायटीमध्ये तृप्ती देवरुखकर यांना कार्यालयासाठी जागा हवी होती. मात्र मराठी लोकांना आम्ही जागा देत नाही अशी भूमिका तिथल्या सोसायटीमधील सचिवांनी घेतली होती. यावरून तृप्ती देवरुखकर आणि त्यांच्या पतीचा या सोसायटीतील सचिवाबरोबर वाद देखील झाला.
“जे लोक भाषेच्या, धर्माच्या, जातीच्या आणि खाण्या पिण्याच्या बाबतीत भेदभाव करून जागा नाकारत असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. आता ज्याप्रकारे मराठी माणसाला तिथे जागा किंवा घर नाकारले जात आहे हे चुकीच आहे,” असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. “2016 मध्ये मुंबई महापालिकेने जे लोक भाषेच्या, धर्माच्या, जातीच्या, खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव करतात, याविरोधात एक प्रस्ताव मंजूर केला होता. अशा इमारतीची ओसी रद्द करण्यात यावी. आता हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर करावे. अशा प्रकारचे प्रकार कुठल्या सोसायटीमध्ये घडले तर त्या सोसायटीचं डी-रजिस्ट्रेशन करून तिथे प्रशासक नेमावा,” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. अश्या विकासकांना भोगवटा प्रमाणपत्रदेखील देऊ नये असं ते म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचं ट्वीट…

मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन ! तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे ! 

पंकजा मुंडे यांना मराठी म्हणून घर नाकारलं हे त्यांनी खूप उशिरा सांगितलं. त्यांनी त्यावेळी सांगितलं असतं तर आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत असतो. आता सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्वतःला एकटं समजू नये. पक्ष बाजूला ठेवून या सगळ्या प्रकरणात आम्ही साथ देऊ आणि त्यांना जिथे हवा तिथे घर मिळवून देऊ,” असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

 

Previous Post

महिला आरक्षण कायदा लागू ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

Next Post

नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार, लघुशंकेसाठी थांबलेल्या चालकाला मारहाण; चार अनोळखी ईसमांनी मारहाण करून लुटले

Next Post
नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार, लघुशंकेसाठी थांबलेल्या चालकाला मारहाण; चार अनोळखी ईसमांनी मारहाण करून लुटले

नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार, लघुशंकेसाठी थांबलेल्या चालकाला मारहाण; चार अनोळखी ईसमांनी मारहाण करून लुटले

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.