Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home आरोग्य

हिवाळ्यात भूईमुगाचे दाणे खा, मिळतात आश्चर्यकारक फायदे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 15, 2024
in आरोग्य
हिवाळ्यात भूईमुगाचे दाणे खा, मिळतात आश्चर्यकारक फायदे
Share on FacebookShare on Whatsapp

भूईमुगाचे दाणे : पावसाळ्यानंतर आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू मानला जातो. या ऋतूत शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे परिधान करण्यासह विविध प्रकारचा सुकामेवा देखील खाल्ला जातो. हिवाळ्यात शरीरात उर्जा टिकून राहावी म्हणून काजू-बदामसारखा सुकामेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. या सुकामेव्यात मुबलक प्रमाणात पोषकतत्वे असतात. मात्र, हा सुकामेवा महाग असल्याने प्रत्येकाला ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा एक सुकामेव्याबद्द सांगणार आहोत जो सर्वसामान्यांना सहज परवडणारा आहे. तसेच हा सुकामेवा प्रत्येक स्वयंपाक घरात सहज अढळतो. चला जाणून घेऊया कोणता आहे हा सुकामेवा आणि काय आहे त्याचे अश्चर्यकारक फायदे.

हिवाळ्या सुदृढ आरोग्यासाठी पौष्टीक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. यात सुकामेव्याला विशेष प्राधान्य दिले जाते. मात्र, प्रत्येकाला काजू-बदामाचा खर्च परवडण्यासारखा नाही. अशा परिस्थित काजू-बदाम सारख्या सुकामेव्यालाही पोषक तत्तवाच्या बाबतीत मागे टाकणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे जवळपास सर्वांना आवडते. काहींना खारे शेंगदाणे तर काहींना गुळासोबत शेंगदाणे खायला आवडते. शेंगदाणे हे पौष्टीक तसेच सर्वसामान्यांना परवडणारे देखील आहे. आरोग्यासाठी फायदेशी असलेल्या शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे पोषकतत्वे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच मुबलक प्रमाणात प्रथिने असल्याने ते स्नायू देखील मजबूत करतात.

मिळतात हे आश्चर्यकार फायदे :

मुबलक प्रमाणात प्रथिने – शेंगदाणे हा प्रथिन्यांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. स्नायूंच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी प्रथिने आवश्यक असतात.

वजन नियंत्रणात ठेवतं – शेंगदाण्यामध्ये फायबर आणि प्रथिने असतात, जे भूक नियंत्रित करतात. याचा लाभ वजन कमी करण्यासाठी होतो.

सुदृढ हृदय – शेंगदाण्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

मेंदूला चालना – शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन B3 (नियासिन) आणि रेझवेराट्रोल असते, जे मेंदूच्या कार्याला चालना देतात.

मजबूत हाडे – कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे मुबलक प्रमाणात असलेले शेंगदाणे हाडांच्या आरोग्यासाठी देखील फायदेखशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात.

ऊर्जेचा उत्तम स्त्रोत – शेंगदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात अढळतात. हे पोषकतत्वे शरीराला जलद ऊर्जा प्रदान करतात.

पचनक्रिया – शेंगदाण्यामधील फायबर पचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करते.

(टीप: वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा अधीक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.)
Previous Post

पुणेकरांनो जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्ती कामी ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद !

Next Post

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक होणार जाहीर

Next Post
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक होणार जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक होणार जाहीर

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.