Lokrakshanay
Thursday, May 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विधानसभेपुर्वी महायुती सरकारने घेतले तब्बल ३८ निर्णय

राज्यात शिक्षकांची जॅम्बो भरती, होमगार्डांच्या भत्यात वाढ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय
विधानसभेपुर्वी महायुती सरकारने घेतले तब्बल ३८ निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी काही दिवसांवर आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे लोकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने विविध निर्णयांचा धडका सुरू केला आहे. अशातच मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या शिक्षक भरतीसंदर्भात आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात तब्बल ४८६० पदे भरली जाणार आहेत. याचसोबत एकूण ३८ महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुती सरकारने तब्बल ३९ महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसोबत राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील सुमारे ४० हजार होमगार्डना याचा लाभ होणार आहे.

👉🏻 मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :

✅ कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू

✅ ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान

✅ ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता

✅ ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

✅ ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार

✅ देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.

✅ भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

✅ रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा

✅ राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार

✅ जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार

✅ लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता

✅ धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन

✅ रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत

✅ केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार

✅ पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक

✅ धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना; धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी

✅ सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख

✅ अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार

✅ सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ

✅ जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार

✅ राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ

✅ नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार

✅ आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती

✅ राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण

✅ आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ

✅ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५

✅ अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित

✅ बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था

✅ मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत

✅ जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय

✅ पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार

✅ राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे

✅ शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही

✅ अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर

✅ माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला

✅ राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.

✅ डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ

✅ महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा

Previous Post

शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन अनुदान वितरण सुरू

Next Post

दापोली, गुहागर आणि राजापुर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित

Next Post
दापोली, गुहागर आणि राजापुर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित

दापोली, गुहागर आणि राजापुर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.