Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..’; विद्यार्थ्यांचे गणवेश पाहून विरोधक संतापले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..’; विद्यार्थ्यांचे गणवेश पाहून विरोधक संतापले
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई :  राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना वाटलेल्या गणवेशाच्या दर्जावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारी शाळांमधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचा दर्जा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते.

या मुद्द्यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चीड व्यक्त केली आहे. अंबादास दानवे यांनी एक्स या समाजमाध्यमावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एका शाळकरी विद्यार्थ्याचा गणवेशातील फोटो ट्विट केला आहे. यामध्ये संबंधित लहान मुलाच्या गणवेशाची अवस्था पाहण्यासारखी आहे. याच मुद्द्यावरुन अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षणमंत्री दीपक केसरकरजी ! विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवल्याचा टोला दानवे यांनी लगावला आहे.

15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली आहे. यावर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि महायुतीचे मंत्री काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल. मात्र, या घटनेमुळे सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी इतर महत्त्वाच्या योजनांचा निधी थांबवल्याच्या विरोधकांच्या दाव्याला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सरकार यादृष्टीने काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.

Previous Post

भ्रष्टाचाराचे आणि फौजदारी स्वरुपाचे आरोप असलेल्या ९६ पालिका अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेने पुन्हा घेतले सेवेत

Next Post

दसरा, दिवाळीत विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने आखली विशेष तिकीट तपासणी मोहीम

Next Post
दसरा, दिवाळीत विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने आखली विशेष तिकीट तपासणी मोहीम

दसरा, दिवाळीत विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने आखली विशेष तिकीट तपासणी मोहीम

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.