Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अपंग प्रवाशांनी प्रवेशासाठी मदत मागितली: डब्यांमध्ये पायऱ्यांची मागणी

मध्य रेल्वेच्या अनेक लोकल डब्यांमधील अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यांना आपत्कालीन पायरी नसल्याने लोकलमधून नोकरी आणि अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या अपंगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
अपंग प्रवाशांनी प्रवेशासाठी मदत मागितली: डब्यांमध्ये पायऱ्यांची मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : मध्य रेल्वेच्या अनेक लोकल डब्यांमधील अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यांना आपत्कालीन पायरी नसल्याने लोकलमधून नोकरी आणि अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या अपंगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडे सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे धावत्या लोकल बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या लोकल रेल्वे स्थानक सोडून फलाट नसलेल्या भागात खोळंबून राहतात. या कालावधीत इतर सामान्य प्रवासी लोकलमधून उड्या मारून पायी प्रवास सुरू करतात. परंतु अपंगांच्या डब्याला आपत्कालीन पायरी नसल्याने या डब्यातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना डब्यात अडकून रहावे लागते. गेल्या काही दिवसात लोकल सिग्नल यंत्रणेतील बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, एक्सप्रेसचे इंजिन बंद पडून लोकलचा खोळंबा होण्याचे प्रकार मध्य रेल्वेच्या बदलापूर- कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानक भागात वाढले आहेत. दोन तास लोकल एकाच जागी याप्रकाराने खोळंबून राहतात. या कालावधीत सामान्य प्रवासी लोकलमधून उड्या मारून रेल्वे मार्गातून जवळच्या रेल्वे स्थानकात किंवा रेल्वे मार्गालगतच्या रस्त्यावर येऊन रिक्षेने इच्छित स्थळी जातात. परंतु, लोकलच्या अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्याला आपत्कालीन पायरी नसल्याने मुंबई परिसरात नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामांसाठी गेलेले अपंग लोकलमधून रेल्वे मार्गात उतरू शकत नाही. काही अपंगांकडे कुबड्या असतात. काहींना सरकत्या गाडीवरून पुढे सरकता येते. अशा अपंग प्रवाशांचे लोकल बंद पडली की हाल होतात. हे अपंग प्रवासी लोकल डब्यातून उतरण्याची धडपड करतात. पण उतरण्यासाठी लोकल डब्याच्या दरवाजा जवळ असलेली आपत्कालीन पायरी नसल्याने अपंगांची गैरसोय होते.

जोपर्यंत लोकल जागची हालत नाही, तोपर्यंत अपंग प्रवासी डब्यात अडकून पडतात. काही अपंगांजवळ पिण्याचे पाणी किंवा भूक लागली असेल तर खाण्यासाठी जवळ काही नसते. त्यांचे या कालावधीत सर्वाधिक हाल होतात. लोकल बंद पडल्यानंतर अशा अपंग प्रवाशांना काही सामान्य प्रवासी रेल्वे फलाटापर्यंत किंवा रेल्वे मार्गालगतच्या रस्त्यापर्यंत नेऊन तेथून वाहनाने प्रवास करण्यासाठी सहकार्य करू शकतात, असे काही अपंगांनी सांगितले. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ज्या अपंग डब्यांना आपत्कालीन पायरी नाही तेथे पायरी जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अपंग डब्यातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांनी केली आहे. काही अपंग विद्यार्थी, महिला या डब्यात प्रवास करतात. लोकल बंद पडल्या की त्यांचे सर्वाधिक हाल होतात. अपंगांच्या डब्यांना आपत्कालीन पायऱ्या असतात. पण काही डब्यांना नसतील तर त्या बसविण्याची व्यवस्था केली जाईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेच्या काही लोकल्सना अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यांना आपत्कालीन पायऱ्या नाहीत. लोकल काही तांत्रिक कारणामुळे बंद पडल्या की इतर सामान्य प्रवासी उड्या मारून रेल्वे मार्गातून निघून जातात. पण अपंग डब्यातील प्रवासी राखीव डब्याला आपत्कालीन पायरी नसल्याने लोकल डब्यात अडकून पडतात. -कल्पेश कोळंबे,अपंग प्रवासी.

Previous Post

मुंबई मेट्रो ३ चा पहिला टप्पा उशिरा: प्रवाशांची प्रदीर्घ प्रतीक्षा

Next Post

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३८ शाळा-मुख्याध्यापकांसह घेतली बैठक

Next Post
वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३८ शाळा-मुख्याध्यापकांसह घेतली बैठक

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३८ शाळा-मुख्याध्यापकांसह घेतली बैठक

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.