Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

सुट्ट्या पैशांच्या वादावरून कल्याण स्टेशनवर रेल्वे स्टाफची महिला प्रवाशाला मारहाण

पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर नेहमी परिणाम होत असतो. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, त्यातच लोकलच गर्दी, चेंगराचेंगरी यामुळेदेखील प्रवासी हवालदिल झालेले असतात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 5, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
सुट्ट्या पैशांच्या वादावरून कल्याण स्टेशनवर रेल्वे स्टाफची महिला प्रवाशाला मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर नेहमी परिणाम होत असतो. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, त्यातच लोकलच गर्दी, चेंगराचेंगरी यामुळेदेखील प्रवासी हवालदिल झालेले असतात. पण आता हे सर्व कमी की काय म्हणून प्रवाशांना चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्टेशनवर ही खळबळजनक घटना घडली असून तिकीट काऊंटरवरील महिला स्टाफने चक्क एक महिलाल प्रवाशाला स्टंपने मारहाण केल्याचा अतिशय खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून संबंधित प्रवासी महिला जखमी झाली आहे. सुट्ट्या पैशांच्या शुल्लक मुद्यावरून झालेल्या वादाला एवढे भयानक वळण लागेल याची कोणीही कल्पनाच केली नव्हती. यामध्ये संबंधित प्रवासी महिला जखमी झाली असून मारहाणाीमुळे तिला मोठा मानसिक धक्काही बसला आहे. य़ा खळबळजनक घटनेटा व्हि़डीओ देखील समोर आला असून स्टाफमधील ती महिला अरेरावी करत वाद घालत असल्याचेही त्यात दिसत आहे.

यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित स्टाफवर वेळीच कारवाई करावी आणि कर्मचाऱ्यांना नीट वागण्याची सूचना द्यावी अन्यथा एकेदिवशी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास परिस्थिती चिघळेल, असा इशारा प्रवाशांकडून देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज ( सोमवार) सकाळी कल्याण स्टेशनवर हा प्रकार घडला. स्टेशनट्या सात नंबर प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकवर जे तिकीट काऊंटर आहे, तेथे हा वाद आणि मारामारी घडली. पीडित महिला तिकीटाच्या लाईनीत उभी होती. सुट्ट्या पैशांच्या मुद्यावरून तिचे तिकीट काऊंटरवीरल स्टाफशी भांडण झाले. बघता बघता त्याचा वांद वाढला, त्यावेळी त्या प्रवासी महिलेने स्टाफचा व्हि़डीओ काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती आणखीनच भडकली. आणि तिने त्या महिलेला आत ऑफीसमध्ये बोलावले आणि तिला चक्क मारहाण केली. तिला कानाखाली मारली. ते पाहून इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत, आरडाओरडा करत त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही स्टाफमधील त्या महिला कर्मचाऱ्याने मारहाण सुरूच ठेवली.

यामध्ये ती महिला प्रवासी गंभीर जखमी झाली तसेच तिला मोठा मानसिक धक्काही बसला. अखेर इतर प्रवाशांनी स्टाफच्या हातातून कशीबशी त्या महिलेची सुटका केली. तेवढ्यात तेथे रेल्वे पोलिस अधिकारी आले आणि त्यांनी प्रकरण समजून घेत मध्यस्थी केली. तब्बल अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवासी व तिकीट काउंटरवरील स्टाफचा वाद मिटला. मात्र प्रवाशांना नेहमीच रेल्वे स्टाफकडून अशी वाईट वागणूक मिळते, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्टाफला वेळीच समज द्यावी अन्यथा एखाद दिवस प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊन चिघळेल असा इशारा उद्विग्न प्रवाशांनी दिला.

Previous Post

कोट्यवधींचे प्रकल्प पण महापालिकेच्या महसूलात बदल नाही, उलट खर्च दोन लाख कोटी

Next Post

मुंबई-गोवा महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीवरून राजकीय लढाई

Next Post
मुंबई-गोवा महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीवरून राजकीय लढाई

मुंबई-गोवा महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीवरून राजकीय लढाई

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.