Lokrakshanay
Saturday, May 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मगरीची तस्करी करणाऱ्या आरोपीवर वनविभागाची कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 11, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
मगरीची तस्करी करणाऱ्या आरोपीवर वनविभागाची कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे: नव्या केंद्रीय कायद्यानुसार विदेशी वन्य प्राणी पाळण्यासाठी आता वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. ती नसल्यास या कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून वन्यप्राणी मगरीच्या पिलाच्या विक्रीसाठी आलेल्या यश पारगावकर (२१) याला सापळा रचून अटक केल्याची माहिती ठाणे वनविभागाने गुरुवारी दिली. त्याला १२ जुलैपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. एक व्यक्ती मगरीच्या पिलाच्या तस्करीसाठी मुंबई उपनगरातील आयआयटी पवई गेट समोर जोगेश्वरी लिंक रोडवर येणार असल्याची गोपनीय माहिती ठाण्याचे उप वनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या पथकाला मिळाली होती. त्याच आधारे सापळा रचून मगरीचे पिल्लू विक्रीस आलेल्या यश या आयआयटी, मुंबई भागातील तरुणाला या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून मगरीच्या पिल्लाची सुटका करण्यात आली आहे. उप वनसंरक्षक सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राकेश भोईर, मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते, वनपाल संदीप यमगर आणि वनरक्षक मिताली महाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. मगर हा प्राणी वन्यप्राणी, वन्यजीव संरक्षण अधिनियम ९७२ च्या अधिसूची-१ मध्ये मोडत असल्याने त्याची विक्री आणि पाळण्यास मनाई आहे. तसे आढळल्यास सात वर्षांच्या शिक्षेची आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद आहे. आरोपी पारगावरकर याच्या विरोधात मुलुंड परिमंडळात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Previous Post

कारखाली चिरडल्याबद्दल 50 हजार दंड; आणि एक महिना कारावास

Next Post

अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांस वंचित पदाधिकाऱ्याकडून मारहाण

Next Post
अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांस वंचित पदाधिकाऱ्याकडून मारहाण

अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांस वंचित पदाधिकाऱ्याकडून मारहाण

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.