Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम; अनधिकृत फेरीवाले रडारवर

पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 28, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम; अनधिकृत फेरीवाले रडारवर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्यावरच मुंबईतील पदपथ तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. इतर वेळी मात्र सामान्य नागरिकांना पदपथावरून चालणे मुश्किल होते, अशा शब्दांत न्यायालयाने कान टोचल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आता पालिका आणि मुंबई पोलिस संयुक्त कारवाई करणार आहेत. फक्त दिवसाच नाही तर रात्रीच्या वेळेस तसेच शनिवार, रविवारीही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन आणि मुंबई पोलिस यांची संयुक्त बैठक पालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त (मुंबई पूर्व विभाग) डॉ. महेश पाटील, उपआयुक्त अभिनव देशमुख उपस्थित होते.

पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. अतिक्रमण निर्मूलन करताना आता सातत्य ठेवावे लागणार आहे. वारंवार कारवाई करून देखील कोणी जुमानत नसेल तर त्यांचा वीजपुरवठा, पाणीपुरवठा खंडित करा. परवाना असेल तर तो रद्द करा आदी सूचनाही आयुक्त गगराणी यांनी केल्या. कांदळवनांवर बांधकामांचा राडारोडा टाकून भराव केला जातो. त्यानंतर त्यावर अनधिकृत बांधकामे केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पालिका प्रशासन आणि पोलिस यांची भरारी पथके नेमून अशा प्रकाराला आळा घालावा, असेही पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. मुंबई पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी अतिक्रमण निर्मूलन कारवाईप्रसंगी पोलिस बंदोबस्त पुरविला जाईल. फेरीवालेमाफिया यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले. पब, बार यांनी अनधिकृतपणे केलेली बांधकामे पाडण्याची कार्यवाही पालिकेने करावी. या आस्थापनांचा, खाद्य परवाना निलंबित करावा, अशीदेखील सूचना चौधरी यांनी केली.

Previous Post

पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!

Next Post

४ वर्षांत ‘इतक्या’ रुग्णांनी गमावला जीव; डेंग्यूने वाढवलं महाराष्ट्रात टेन्शन

Next Post
४ वर्षांत ‘इतक्या’ रुग्णांनी गमावला जीव; डेंग्यूने वाढवलं महाराष्ट्रात टेन्शन

४ वर्षांत 'इतक्या' रुग्णांनी गमावला जीव; डेंग्यूने वाढवलं महाराष्ट्रात टेन्शन

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.