Lokrakshanay
Sunday, May 31, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मरीन ड्राईव्ह येथे सुशोभीकरण प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 21, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, दि. २१ : मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली. यामुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे मुंबईतील प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिका आणि आय लव्ह मुंबई यांच्यातर्फे मरीन ड्राईव्ह येथे आयोजित सुशोभीकरण प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, माजी मुख्य न्यायाधीश मोहित शांतीलाल शाह, शायना एनसी, जॅकी श्रॉफ आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते फीत कापून वारली पेंटिंग, योग मुद्राचे उद्घाटन करण्यात आले, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह त्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन म्हणाले, मरीन ड्राईव्ह येथे सुंदर सुशोभीकरण केले आहे. नाना चुडासामा यांचे सामाजिक काम महत्त्वपूर्ण असून मुंबईत विविध सुशोभीकरणासाठी त्यांनी हातभार लावला आहे. नाना चुडासामा यांचे काम शायना एनसी पुढे चालवित आहेत. शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविण्यात येणार आहे. सर्व रस्ते सिमेंटचे करणार असल्याने खड्डेमुक्त शहर होण्यास मदत होईल. जुलैपर्यंत सी लिंकपर्यंत संपूर्ण काम होईल, कोस्टल रोड, मेट्रो यामुळे नागरिकांना वाहतूक समस्येतून  दिलासा मिळाला आहे. शायना एनसीमुळे भायखळा स्टेशनला युनेस्कोचा पुरस्कार मिळाल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला. योगाचे महत्त्व अधोरेखित करणारे योगाचे पोस्टर्स आकर्षक असल्याचाही उल्लेख यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केला.

Previous Post

रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला; पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही

Next Post

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत आरोपींना अटक

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत आरोपींना अटक

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.