Lokrakshanay
Tuesday, May 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मदतकार्याला वेग

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 17, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे :- सिक्कीम येथील लॅच्युन्ग व्हॅली येथे मुसळधार पाऊस पडून रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक राज्यातील पर्यटक तिथे अडकले आहेत. यात महारष्ट्र राज्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे. ही बातमी आज सकाळी समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे आता आज या सर्व पर्यटकांना वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने गंगटोक येथे सुरक्षितस्थळी हलवण्यात येणार आहे.

सिक्कीम येथे झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे तेथील स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ही बातमी मुख्यमंत्र्यांना माध्यमांद्वारे समजली. त्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून अडकलेल्या सर्व पर्यटकांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री यांनी स्वतः सिक्कीम सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून राज्यातील पर्यटकांना मदत मिळवून देण्याची विनंती केली आहे. तसेच तिथे अडकलेल्या पर्यटक सुनीता पवार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांना लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन धीर दिला आहे.

सिक्कीममधून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व पर्यटक हे सध्या सुरक्षित असून त्यांच्यापर्यंत सर्व  मदत पोहचवण्यात येत आहे. तसेच त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले असून आज वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना गंगटोक येथे सुरक्षितस्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या मदतकार्यावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत. यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी हे देखील या पर्यटकांशी सतत संपर्कात आहेत. त्यांच्याशिवाय अजून कुणीही सिक्कीममध्ये अडकले असल्यास त्यांनी त्वरित राज्य शासनाला संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

१२ लाखांचे विदेशी मद्य जप्त; आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

Next Post

आईस्क्रीममध्ये मानवी बोट, उत्पादकाचा परवाना रद्द

Next Post
आईस्क्रीममध्ये मानवी बोट, उत्पादकाचा परवाना रद्द

आईस्क्रीममध्ये मानवी बोट, उत्पादकाचा परवाना रद्द

BreakingNews

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.