Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सहा लाखांची दररोज फुकट्या प्रवाशांकडून वसुली

पुणे विभागात फेब्रुवारीमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २२ हजार १८२ जण विनातिकीट प्रवास करताना आढळून आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 4, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
सहा लाखांची दररोज फुकट्या प्रवाशांकडून वसुली
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. रेल्वेने फेब्रुवारी महिन्यात २२ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. मागील महिन्यात रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून दररोज सरासरी सहा लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. पुणे विभागात फेब्रुवारीमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २२ हजार १८२ जण विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, अनियमित प्रवास करणाऱ्या ८ हजार ३९२ जणांवर कारवाई करून त्यांना ४९ लाख ९८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचबरोबर सामानाची नोंदणी न करता तसेच घेऊन जाणाऱ्या १६५ प्रवाशांकडून १८ हजार २५०रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

विनातिकीट प्रवासी – २२ हजार १८२

विनातिकीट दंड – १ कोटी ७५ लाख रुपये

अनियमित प्रवासी – ८ हजार ३९२

अनियमित प्रवास दंड – ४९ लाख ९८ हजार रुपये

विनानोंदणी सामान – १६५ प्रवासी

विनानोंदणी सामान दंड – १८ हजार २५० रुपये

Previous Post

१५० कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज छापेमारीत पकडले; पुण्यात पुन्हा मोठी कारवाई

Next Post

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

Next Post
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.