Lokrakshanay
Saturday, October 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

२४ वर्षीय नोकरदार तरूणीचा विनयभंग

पीडित तरूणी कल्याण पश्चिमेत राहते. त्याच भागातील एका व्यापारी संकुलात ती नोकरी करते. आरोपी मोहसिन शेख हा कल्याण मधील सिंधीगेट भागात राहतो.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 5, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
२४ वर्षीय नोकरदार तरूणीचा विनयभंग
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण – मागील महिनाभर कल्याण मधील एका २४ वर्षीय नोकरदार तरूणीचा पाठलाग करून, तू माझ्यावर प्रेम कर. तू माझ्यावरील प्रेमाला नकार दिला तर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या, तसेच या तरूणीचा विनयभंग करणाऱ्या मोहसिन शेख (२४) या तरूणाविरूध्द पीडित तरूणीच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरूणी कल्याण पश्चिमेत राहते. त्याच भागातील एका व्यापारी संकुलात ती नोकरी करते. आरोपी मोहसिन शेख हा कल्याण मधील सिंधीगेट भागात राहतो. नाॅन फूड व्हर्टेक्स व्हाॅट्सप ग्रुपमधून प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकावरून पीडित तरूणी आणि आरोपी तरूण मोहसिन यांची ओळख झाली होती. गेल्या महिनाभर आरोपी मोहसिन पीडितेचा पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालत होता. पण पीडिता त्याला दात देत नव्हती.

पोलिसांनी सांगितले, आरोपी तरूण मोहसिन आणि पीडित तरूणी यांची व्हाॅट्सप ग्रुपच्या माध्यमातून ओळख झाली होती. या परिचयातून मोहसिन याने पीडितेचा विश्वास संपादन केला होता. तो तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला दररोज तुझ्या घरी माझ्या दुचाकीने सोडत जाईन. आपण बाहेर फिरायला जाऊ. तू जर माझ्या बरोबर आली नाहीस, माझ्यावर प्रेम केले नाहीस तर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी आरोपी देत होता. पीडिता घरातून आपल्या कामाच्या ठिकाणी आणि कामावरून घरी जाण्यास निघाली की आरोपी तिचा पाठलाग करायचा. तिला फिरण्यासाठी येण्याचा आग्रह करायचा. असाच एकदा पाठलाग करत असताना आरोपीने पीडितेला थांबवून तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला, असे पोलिसांनी सांगितले. महिनाभर सुरू असलेल्या या प्रकाराने पीडित तरूणी त्रस्त होती. तिने घडला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांच्या पुढाकाराने या पीडितेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. ए. आर. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. बी. साबळे तपास करत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी काही महिला संघटनांनी केली आहे.

Previous Post

मुंबई-गोवा महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीवरून राजकीय लढाई

Next Post

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवासी घाबरले, जीवितहानी नाही

Next Post
ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवासी घाबरले, जीवितहानी नाही

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवासी घाबरले, जीवितहानी नाही

BreakingNews

पाणीटंचाईत टँकर बुकिंगसाठी फोन करण्याचे टेन्शन मिटले; आता ॲपवरून करा वॉटर टँकर बुक!

महाराष्ट्रातील मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवा प्रयोग; आंध्रच्या कोळंबी प्रकल्पांची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी

ऑस्करच्या शर्यतीतील मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता जगभरात गाजणार; होम्बळे फिल्म्स करणार ओव्हरसीज रिलीज!

‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात; ठाणे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन ६० दिवस बंद राहणार; भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट

मुंबईत ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान ‘रंगीलो रे’ गरबा महोत्सव; पार्थिव गोहिल यांचे थेट सादरीकरण ठरणार आकर्षण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.