Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१०९८ गुन्हे मीरारोड वैतरणा स्थानकादरम्यान वर्षभरात

मोबाइल चोरी, पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडत आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 20, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. यंदाच्या वर्षात वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एक हजार ९८ गुन्हे घडले आहेत. त्यातील ९८० गुन्हे हे मोबाइल चोरीचे आहेत. वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा भुरट्या चोरांनी घेतला आहे. मोबाइल चोरी, पाकीट मारी, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडत आहेत.

विशेषत: विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकांत सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. यंदाच्या वर्षात मीरारोड ते वैतरणा यादरम्यान १०९८ इतके गुन्हे घडले आहेत, त्यापैकी ३८७ गुन्हे उघडकीस आले आहेत. हे प्रमाण ३५ टक्के असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १५० ने गुन्ह्यात वाढ आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त घालणे, संशयितांची तपासणी, जनजागृती मोहिमा असे उपक्रम राबविले जात आहेत. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. पोलीस रेल्वे स्थानकात गस्त जरी घालत असले तरी अनेक घटना पटकन नजरेस पडत नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे अधिकच फायदेशीर ठरत आहे. बहुतांश गुन्हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघड झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. रेल्वेत घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण हे मागील वर्षांपासून वाढले आहे. ते कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. प्रवाशांनीसुद्धा काळजीपूर्वक प्रवास करावा किंवा प्रवासादरम्यान आक्षेपार्ह काही आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाइल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी हे मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी ९८० गुन्हे मोबाइल चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे

गुन्ह्यांचा तपशील

वर्ष       गुन्हे       उघड गुन्हे

२०२३ –  १०९८                ३८७

२०२२ –  ९५३               ३९४

Previous Post

९ कोटी रुपयांची कस्टम अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक; फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Next Post

एका क्लिकवर कळणार कळवा रुग्णालयातील रुग्णांचा पुर्वइतिहास

Next Post
एका क्लिकवर कळणार कळवा रुग्णालयातील रुग्णांचा पुर्वइतिहास

एका क्लिकवर कळणार कळवा रुग्णालयातील रुग्णांचा पुर्वइतिहास

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.