Lokrakshanay
Monday, July 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी; चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 25, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी; चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण दलाची जमीन घेण्याच्या मोबदल्यात मुंबई महापालिका संरक्षण दलाला ११ कोटी रुपये देणार आहे. नेमकी किती रक्कम द्यायची, असा पेच निर्माण झाल्याने लिंक रोडच्या विस्तारीकरणात अडचण निर्माण झाली होती. पुलावरील मार्गिका वाढवण्यासाठी अतिरिक्त जमिनीची गरज होती. मात्र जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेवरून संरक्षण आणि पालिकेत तोडगा निघत नसल्याने लिंक रोडच्या पहिल्या टप्प्यातील विस्ताराचे काम रखडले होते.

लिंक रोडचा कपाडियानगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वाकोला जंक्शनपर्यंत विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात वाकोला जंक्शन, आंबेडकर चौक, विद्यापीठ आणि बीकेसी, तर दुसऱ्या टप्प्यात भारत डायमंड बोर्ज ते वाकोला जंक्शन असा विस्तार होणार आहे. आता तोडगा निघाल्याने महापालिकेनीही रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मोबदल्याच्या रकमेवरून दोनी बाजूंकडून बराच काळ सहमती मिळत नव्हती. संरक्षण दलाने २७ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र रेडीरेकनर दरानुसार भाव देऊ, अशी पालिकेची भूमिका होती. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ बराच काळ सुरू होते. लिंक रोडच्या ३.८ किमी टप्प्यातील विस्तारासाठी ४१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्ष २०१६ पासून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वर्ष २०१९ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र हा मुहूर्त काही पालिकेला साधता आलेला नाही. आता ११ कोटी रुपये आम्ही तुम्हाला देतो, उर्वरित रकमेचे अंतिम करार होताना बघू, अशी विनंती पालिकेने संरक्षण दलाला केल्याचे समजते.

लिंक रोडच्या माध्यमातून चेंबूर येथून अवघ्या काही मिनिटांत बीकेसीच्या दिशेने येणे शक्य होते; मात्र लिंक रोड ज्या ठिकाणी संपतो, त्यापुढे कुर्ला-सीएसटी रोड ते बीकेसीपर्यंत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे लिंक रोडवरून सुरू होणाऱ्या वेगवान प्रवास करता येत नाही. बीकेसी आणि पुढे पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत प्रवास सुसाट व्हावा, यासाठी लिंक रोडच्या विस्ताराचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Previous Post

पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एका राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाचे निलंबन

Next Post

पायऱ्यांची केली नासधूस, पालिकेकडून डागडुजी; बाणगंगा तलावाच्या कंत्राटदारावर गुन्हा

Next Post
पायऱ्यांची केली नासधूस, पालिकेकडून डागडुजी; बाणगंगा तलावाच्या कंत्राटदारावर गुन्हा

पायऱ्यांची केली नासधूस, पालिकेकडून डागडुजी; बाणगंगा तलावाच्या कंत्राटदारावर गुन्हा

BreakingNews

कल्याण-डोंबिवलीत विनापरवाना पॉलीक्लिनिकवर छापा; १.०३ लाखांचा औषधसाठा जप्त करत FDAचा दणका

बस कंडक्टर ते भारतीय सिनेसृष्टीचे ‘थलायवा’; सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी येणार रुपेरी पडद्यावर?

गोपाळगड किल्ला अखेर शासनाच्या ताब्यात! पर्यटकांचा मुक्त प्रवेशाचा मार्ग मोकळा

CJP नंतर आता ‘E20 जनता पार्टी’ मैदानात! शुद्ध पेट्रोलच्या मागणीसाठी सोशल मीडियावर डिजिटल आंदोलन

देशातील पहिला ‘चालता रस्ता’ महालक्ष्मीत; मेट्रो, मोनोरेल आणि लोकलचे एकाच ठिकाणी कनेक्शन

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.