Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

सुवर्णपदकावर ९ वर्षांनी कोरले नाव; भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास

भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई संघात इतिहास रचला आहे. फायनलमध्ये जपानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्यांदा १९५८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 6, 2023
in क्रीडा
सुवर्णपदकावर ९ वर्षांनी कोरले नाव; भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. टीम इंडियाने अंतिम फेरीत गतवेळच्या आशिया चॅम्पियन जपानचा ५-१ असा पराभव केला. याआधी पूल राऊंडमध्येही भारत आणि जपान आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारताने ४-२ ने विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात भारताकडून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. भारतासमोर प्रतिस्पर्धी जपानला केवळ एकच गोल करता आला. या सुवर्णपदकासह भारतीय हॉकी संघ २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्याच्या २५व्या मिनिटाला भारताकडून सामन्यातील पहिला गोल करण्यात आला. मनदीप सिंगने हा गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अशाप्रकारे सामन्याच्या हाफ टाईममध्ये भारतीय संघाने आघाडी घेतली.

भारताने जपानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पहिला गोल केला. यानंतर तिसऱ्या क्वार्टर आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने प्रत्येकी दोन गोल केले. भारताकडून मनप्रीत सिंग (२५वे मिनिट), अमित रोहिदास (३६वे मिनिट), कर्णधार हरमनप्रीत सिंग (३२वे मिनिट) आणि अभिषेक (४८वे मिनिट) यांनी गोल केले. जपानसाठी तनाका सेरेनने एकमेव गोल केला. भारतीय हॉकी संघाने, २०२३ आणि २०१४ च्या पूर्वी १९६६ आणि १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. चार सुवर्णांव्यतिरिक्त, टीम इंडियाने १९५८, १९६२, १९७०, १९७४, १९७८, १९८२, १९९०, १९९४, २००२ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर १९८६, २०१० आणि २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

Previous Post

नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार, लघुशंकेसाठी थांबलेल्या चालकाला मारहाण; चार अनोळखी ईसमांनी मारहाण करून लुटले

Next Post

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.