Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

फेंगल चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रवरसुद्धा, सहा जिल्ह्यांना ” यल्लो ” अलर्ट.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 3, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
फेंगल चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रवरसुद्धा, सहा जिल्ह्यांना ” यल्लो ” अलर्ट.
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : फेंगल चक्रीवादळ नावाचे भलेमोठे संकट भारतासमोर उभे झाले आहे. या चाकरी वादळाने मोठ्याप्रमाणावर हाहाकार माजवलाय. पुद्दुचेरीमध्ये मोठा कहर बघायला मिळाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक विमाने रद्द करण्यात आली आणि शाळांनी सुट्टी जाहीर केली. अनेक रस्त्यांवर नद्या वाहत असल्यासारखे दृश्य पाहायला मिळाले. या फेंगल चक्रीवादळाचा दुष्प्रभाव महाराष्ट्रामध्येही दिसतोय. सकाळपासूनच वातावरण ढगाळ झालेले दिसतंय. यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये पावसाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब आहे. भारतीय हवामान विभागाचे पुण्याचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबद्दलची माहिती ‘X’ वर शेअर केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून या चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली. मागील काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच वाढली होती. सांगली, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, धावशिव, वाशिम, हिंगोली, बीड आणि संभाजीनगर या जिल्हांमध्ये पावसाची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळ येत्या २४ तासात साध्यापेक्षाही तीव्र होण्याची दाट शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

फेंगल चक्रीवादळ सध्या भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर आहे. यामुळेच त्याचा परिणाम वातावरणावर झाल्याचे बघायला मिळतोय . हवामान खात्यासह पंजाबराव डख यांनी देखील फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसणार असल्याचे म्हटले. बऱ्याचदा पंजाबराव डख यांनी हवामानाबद्दल दिलेले अंदाज खरे होताना दिसतात. पंजाबराव डख यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. सहा जिल्ह्यांमध्ये फेंगल चक्रीवादळाचा परिणाम 5 डिसेंबरला अधिक राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. गुरुवारी सातारा, पुणे, रत्नागिरी, लातूर, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलाय.

फेंगल चक्रीवादळाने शेतकऱ्यांची चिंतादेखील वाढवली आहे कारण पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. फेंगल वादळाचा मोठा फटका चेन्नई विमानतळाला बसला. थेट अनेक विमाने रद्द करावी लागली. फेंगल चक्रीवादळामध्ये एक विमान लॅंड करताना पूर्ण हलताना दिसेल, असा एक व्हिडीओ चेन्नई विमानतळावरून व्हायरल होताना दिसला. काही वेळाचा तो चेन्नई विमानतळावरील व्हिडीओ नक्कीच हृदयाचे ठोके गतिमान करणारा होता. लोक त्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले.

Previous Post

उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत भर. सेबीची कारवाई, खाती गोठवली.

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; मंचर परिसरात २५० किलो भांगमिश्रीत गोळ्या जप्त

Next Post
कल्याणमध्ये वेश्या व्यवसायात तरूणींना आणून पैसे कमावणारी महिला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; मंचर परिसरात २५० किलो भांगमिश्रीत गोळ्या जप्त

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.