Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबईत आरोपीला चरस विक्री प्रकरणी अटक

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी भागात चरस विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 20, 2023
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबईत आरोपीला चरस विक्री प्रकरणी अटक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी भागात चरस विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आले आहे. त्याच्या कडून एक किलो ३३८ ग्रॅम वजनाचे चरस आढळून आले आहे. सदर कारवाई तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.

संजीव प्रकाश पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नेरुळ सेक्टर वीस येथे राहतो. पेशाने टेम्पो चालक असलेला संजीव हा अंमली पदार्थ विक्री अनेक महिन्यापासून करतो. त्याच्या बाबत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्याचा माग काढला असता तो तुर्भे एमआयडीसी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र कधी याबाबत साशंकता होती. तो तुर्भे एमआयडिसीतील निवारा लॉज परिसरात आढळून आल्याची बातमी पोलिसांना मिळाली. तात्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र  दौंडकर यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले यांच्या नेतृत्वाखाली सदर ठिकाणी पथक पाठवले. त्यावेळी संजीव हा दिसताच त्याला ताब्यात घेत तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कडे एक किलो ३३८ ग्रॅम  वजनाचे चरस आढळून आले. हा काळा चिकट पदार्थ चरस असल्याची तज्ञ व्यक्तीने शहानिशा करताच आरोपी संजीव याला अटक करण्यात अली आहे. त्याच्या कडील  एक किलो ३३८ ग्रॅम  वजनाचे चरस, दुचाकी, मोबाईल आणि काही रोख रक्कम असे एकूण ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी दिली.

Previous Post

गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार ५० हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले

Next Post

४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

Next Post
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.