Lokrakshanay
Saturday, November 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

व्हॉट्सॲप ग्रुपची मर्यादा वाढली; आता एकाच ग्रुपमध्ये जोडता येणार १,५०० सदस्य!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 20, 2026
in ताज्या बातम्या
व्हॉट्सॲप ग्रुपची मर्यादा वाढली; आता एकाच ग्रुपमध्ये जोडता येणार १,५०० सदस्य!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : व्हॉट्सॲप वापरणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त १,०२४ सदस्य जोडण्याची मर्यादा होती. मात्र, व्हॉट्सॲपने आता ही मर्यादा वाढवत एका ग्रुपमध्ये तब्बल १,५०० सदस्य सहभागी करण्याची सुविधा सुरू केली आहे. हे अपडेट अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात असून, ग्रुप ॲडमिनला कोणतेही अतिरिक्त सेटिंग बदलण्याची आवश्यकता भासणार नाही.

व्हॉट्सॲपमधील नव्या बदलांची माहिती देणाऱ्या WABetaInfo या संकेतस्थळानुसार, ही सुविधा जुन्या आणि नव्या दोन्ही ग्रुपसाठी लागू होणार आहे. एखाद्या ग्रुपमध्ये आधीच १,०२४ सदस्य असतील, तर अपडेट मिळाल्यानंतर त्यात आणखी ४७६ सदस्य सहज जोडता येणार आहेत. त्यामुळे नवीन ग्रुप तयार करण्याची किंवा विद्यमान सदस्यांना हटविण्याची गरज राहणार नाही. नवीन सदस्यसंख्या मर्यादा केवळ सामान्य ग्रुपपुरती मर्यादित नसून व्हॉट्सॲप कम्युनिटीमधील स्वतंत्र ग्रुपनाही लागू होणार आहे. त्यामुळे मोठ्या संस्था, शैक्षणिक गट, व्यावसायिक संघटना आणि समुदायांना एकाच ग्रुपमध्ये अधिक सदस्य जोडणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपने ग्रुप सदस्यसंख्या टप्प्याटप्प्याने वाढवली आहे. २०१६ मध्ये १०० वरून २५६, त्यानंतर ५१२, पुढे २०२२ मध्ये १,०२४, आणि आता १,५०० सदस्यांची मर्यादा करण्यात आली आहे. याशिवाय अलीकडेच महत्त्वाचे संदेश पिन करण्याची सुविधा, स्टेटस अपडेट शेअर करणे, मेंशन आणि रिप्लायवर आधारित संभाषण शोधणे, तसेच नवीन सदस्यांसोबत अलीकडील चॅट हिस्ट्री शेअर करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या बदलांमुळे मोठ्या ग्रुपमधील संवाद आणि व्यवस्थापन अधिक सोपे व प्रभावी होणार आहे.

Previous Post

महापालिका रुग्णालयांत ‘व्हॉट्सॲप कार्यालय’ आणि ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ सुरू होणार

Next Post

पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांना ‘नो एन्ट्री’; नागरिकांना थेट मदतीसाठी अधिकारी प्रवेशद्वारावर

Next Post
पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांना ‘नो एन्ट्री’; नागरिकांना थेट मदतीसाठी अधिकारी प्रवेशद्वारावर

पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांना 'नो एन्ट्री'; नागरिकांना थेट मदतीसाठी अधिकारी प्रवेशद्वारावर

BreakingNews

पनवेल आरटीओ कार्यालयात दलालांना ‘नो एन्ट्री’; नागरिकांना थेट मदतीसाठी अधिकारी प्रवेशद्वारावर

व्हॉट्सॲप ग्रुपची मर्यादा वाढली; आता एकाच ग्रुपमध्ये जोडता येणार १,५०० सदस्य!

महापालिका रुग्णालयांत ‘व्हॉट्सॲप कार्यालय’ आणि ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ सुरू होणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक; मातोश्री सावित्री देवी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

Instagram चे नवे फीचर; आता स्टोरी पोस्ट केल्यानंतरही १५ मिनिटांत करता येणार एडिट

भिवंडीत आयात अन्नपदार्थांवरील उत्पादन व कालबाह्यता तारखांमध्ये फेरफार; २.०६ कोटींचा माल जप्त!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

imunify-bot-check