Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मराठी भाषा वाचवण्यासाठी आपणच पुढे यायला हवे – साहित्यिक विश्वास पाटील

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 4, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
मराठी भाषा वाचवण्यासाठी आपणच पुढे यायला हवे – साहित्यिक विश्वास पाटील
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी वाड्मय वाचवण्यासाठी आपणच पुढे यायला हवे. एका वर्गात एक मुलगा असला तरी त्याला मराठी शिकवलीच पाहिजे. कारण याच मुलामधून उद्या एखादा तुकाराम किंवा ज्ञानेश्वर जन्म घेईल, असे साहित्यिक व ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्यावतीने शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष साहित्यिक विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कवी व गीतकार प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दिक्षित हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले, मला दोन गोष्टींचा प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो. एक म्हणजे माझा महाराष्ट्रात जन्म झाला आहे आणि दुसर माझी मातृभाषा मराठी आहे. तसेच जगाचा विचार केला तर भारतातील राज्याच्या नावातच राष्ट्र आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रात एवढी कर्तबगार व्यक्ती जन्माला आली आहेत. तेवढ्या उंचीची शिखरे हिमालयात देखील नाहीत असे ते म्हणाले.त्याचप्रमाणे महाराष्ट्र ही अशी भूमी आहे जिथे टिळक, आंबेडकर, सावरकर, फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, आचार्य अत्रे अशी थोर व्यक्तिमत्वे जन्माला आली. एवढ्या विद्वानांची परंपरा इतर कोणत्याही प्रांतात नाही, असे पाटील म्हणाले. मराठी सारखी दुसरी कुठली भाषा नाही कारण मराठी भाषेत ज्ञानोबा आणि तुकोबा या दोघांच्या उंचीची शिखरे निर्माण झाली आहेत. म्हणून मला मराठीच खूप कौतुक वाटत. त्यानिमित्त मला अध्यक्षपद मिळतंय याचा आनंद आहे असे देखील त्यांनी सांगितले.माय मराठी ही आपण जपली पाहिजे. गरजेपोटी मला काही ऐतिहासिक विषय लिहावे लागले. कारण की इतिहास कसा वाचावा, कसा ऐकवावा आणि साठवावा हेच लोक विसरून गेले होते. मला खरतर इतिहास ग्रंथ पाहिजे होते. पण नंतर लक्षात आलं इतिहास ग्रंथ लिहिले तर ते फक्त ग्रंथालयाच्या कपाटात धन होईल, लोकांपर्यंत पोहचणार नाही असे ते म्हणाले.

Previous Post

दसऱ्याच्या दिवशी कोसळला दुःखाचा डोंगर; लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next Post

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा

Next Post
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.