Lokrakshanay
Tuesday, September 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

BEST बसमध्ये दिव्यांगांचा प्रवास आता १००% मोफत; महापालिकेकडून ७.६४ कोटींच्या अनुदानाला मंजुरी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 8, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
BEST बसमध्ये दिव्यांगांचा प्रवास आता १००% मोफत; महापालिकेकडून ७.६४ कोटींच्या अनुदानाला मंजुरी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दृष्टिहीन तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना ‘बेस्ट’च्या साध्या विनावातानुकूलित बसमधून पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. या योजनेसाठी मुंबई महापालिकेने ₹७ कोटी ६४ लाख ५५ हजार १७० इतक्या अनुदानाला मंजुरी दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. दिव्यांग नागरिकांना सवलतीचा लाभ सुरळीत मिळावा यासाठी त्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी केली जाणार असून, ही संपूर्ण जबाबदारी बेस्ट उपक्रमाकडे असेल. तसेच प्रत्येक तिमाहीतील खर्चाचा लेखापरीक्षित अहवाल, ओळखपत्रांची नोंद आणि तिकीट वितरण यंत्रातील माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना समान संधी, संरक्षण आणि संपूर्ण सहभाग मिळावा या उद्देशाने महापालिका सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट बसमधील मोफत प्रवासाची सुविधा अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नियमांनुसार महापालिकेला आपल्या अंदाजपत्रकातील किमान ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव ठेवावा लागतो. यापैकी ₹५ कोटी महिला व बालकल्याण विभागाच्या तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात येणार असून, उर्वरित ₹२ कोटी ६४ लाख ५५ हजार १७० नियोजन विभागाच्या निधीतून पुनर्वाटप करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षात या योजनेसाठी ₹४ कोटी ८८ लाख ४ हजार ९८३ इतके अनुदान देण्यात आले होते. यंदा मंजूर करण्यात आलेली वाढीव रक्कम दिव्यांग नागरिकांच्या मोफत प्रवासाची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, हजारो लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

Previous Post

“…तेव्हाच हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल”; इराणची अमेरिकेला थेट इशारा

BreakingNews

BEST बसमध्ये दिव्यांगांचा प्रवास आता १००% मोफत; महापालिकेकडून ७.६४ कोटींच्या अनुदानाला मंजुरी

“…तेव्हाच हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल”; इराणची अमेरिकेला थेट इशारा

आंतरराज्यीय आयफोन चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून ४ आरोपींना अटक!

राजधानी दिल्ली हादरली! पाच मजली इमारत विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली?

Instagram वरही मुंढेंची क्रेझ; फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंना टाकले मागे!

‘बिग बॉस २०’ चा धमाका; ‘तथास्तु’ थीम आणि नव्या नियमांसह ५० लाखांसाठी रंगणार महासंग्राम!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.