Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

रत्नागिरीतील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, रत्नागिरी
रत्नागिरीतील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात असलेल्या कोळंबे येथील कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी संस्थेचा अध्यक्ष व त्यांचा मुलगा आणि मुख्याध्यापक अशा तिघांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शहर पोलीस ठाण्यातून संगमेश्वर पोलीस ठाण्यात झिरो नंबरने पाठवण्यात आला आहे.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अध्यक्ष नयन मुळ्ये (वय ६८), त्याचा मुलगा प्रथमेश मुळ्ये आणि मुख्याध्यापक संजय मुळ्ये या तिघांचा समावेश आहे. याविषयी संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा संगमेश्वर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या या तिन्ही मुली गणपती सुट्टीदरम्यान आपल्या गावी गेल्या नव्हत्या. त्यातील एक १७ वर्षीया पीडिता ही फिर्यादी असलेल्या ग्रंथपाल महिलेकडे या सुट्टीत राहाण्यासाठी गेली होती. त्यानंतर फिर्यादी आपल्या गावी गेल्यानंतर ती पीडिता ही संस्थेचे अध्यक्ष नयन मुळ्ये यांच्या घरी राहाण्यासाठी गेलेली असताना संशयित नयन मुळ्येने तिचा विनयभंग केला. तर त्याच्या मुलाने पीडितेला धमकावले. याबाबत तिने मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पीडितेने गणपती सुट्टीनंतर घडलेला सर्व प्रकार फिर्यादी महिलेला सांगितला. असे तिने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तर अन्य दोन पीडितांचा विनयभंग कोठे करण्यात आला याचा तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. मात्र याविषयी तक्रारीनंतर तिघांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई

Next Post

माहिती अधिकार कायद्यात सामान्य माणसाला दक्ष नागरिक घडविण्याची ताकद

Next Post
माहिती अधिकार कायद्यात सामान्य माणसाला दक्ष नागरिक घडविण्याची ताकद

माहिती अधिकार कायद्यात सामान्य माणसाला दक्ष नागरिक घडविण्याची ताकद

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.