Lokrakshanay
Sunday, March 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरूंना फटकारले

तमिळनाडूमधील कोयंबतूर येथील ईशा योग केंद्राची पोलिसांनी झाडाझडती

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 2, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश, राष्ट्रीय
मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरूंना फटकारले
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : जग्गी वासुदेव म्हणजेच सदगुरु यांच्या ईशा फाऊंडेशनच्या कोयंबतूरच्या आश्रमात आपल्या दोन मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप करत एका व्यक्तीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनी आपल्या मुलीचा विवाह केला आहे तर इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? असा सवाल करत मद्रास उच्च न्यायालयानं सद्गुरुंना फटकारले आहे.

जग्गी वासुदेव म्हणजेच सदगुरु यांच्या ईशा फाऊंडेशनच्या कोयंबतूरच्या आश्रमाची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ईशा फाऊंडेशनच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. यानंतर तमिळनाडूमधील कोयंबतूर येथील ईशा योग केंद्राची पोलिसांनी झाडाझडती घेतली.

न्यायालयात हिबियस कॉर्पस याचिका दाखल करून एस. कामराज नामक व्यक्तीने ईशा फाऊंडेशनवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या ४२ व ३९ वर्षांच्या दोन्ही मुली आश्रमात कोंडून ठेवल्याचा ठपका या व्यक्तीनं ठेवला असून त्यांना सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप या याचिकेत केला आहे.

या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसले. एक व्यक्ती ज्यांनी आपल्या मुलीचा विवाह लावून तिला संसारामध्ये स्थिर केले आहे, तो इतरांच्या मुलींना डोक्यावरचे केस काढून संन्यासी जीवन जगायला कसे सांगू शकतो, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. असा थेट सवाल मद्रास उच्च न्यायालयाने केला आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर कोयंबतूरमधील ईशा योग केंद्राची १०५ पोलिसांनी झडती घेतली. मात्र, केंद्रानं ही झडती नसून केवळ चौकशीसाठी पोलीस आल्याचा दावा केलाय. दरम्यान, न्यायालयातील सुनावणीदरम्यान गीता आणि लता या दोघीही हजर होत्या. आपल्या मुलींना बळजबरीनं आश्रमात ठेवल्याचं सांगितल्यावर या दोघींनीही आपण स्वत:हून इथं राहत असल्याचं सांगितलय. मात्र, आपल्या उच्चशिक्षित मुलींचा ब्रेनवॉश करण्यात आल्याचा आरोप कामराज यांनी केलाय. आपल्या उच्चशिक्षित मुलींना प्रभावित करून त्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यात आल्याचा आरोप कामराज यांनी केला. त्यानंतर काही जणांना डांबून ठेवल्याचा आणि नातलगांना भेटू देत नसल्याचा आरोप केला असून संस्थेमधील परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

Previous Post

जातनिहाय आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेला ‘वंचित’ला निवडून द्या: प्रकाश आंबेडकर

Next Post

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून ७ महिन्यांच्या बालकाचे अपहरण

Next Post
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून ७ महिन्यांच्या बालकाचे अपहरण

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून ७ महिन्यांच्या बालकाचे अपहरण

BreakingNews

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.