Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पंतप्रधान आणि मुख्यमत्र्यांना पत्राद्वारे घालणार साकडे; मदर डेअरीची जागा वाचविण्यासाठी कुर्लावासियांचे पोस्टकार्ड आंदोलन

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडला (डीआरपीपीएल) देण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 24, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
पंतप्रधान आणि मुख्यमत्र्यांना पत्राद्वारे घालणार साकडे; मदर डेअरीची जागा वाचविण्यासाठी कुर्लावासियांचे पोस्टकार्ड आंदोलन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडला (डीआरपीपीएल) देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला कुर्ल्यातील रहिवाशांनी विरोध करून जनआंदोलन उभे केले आहे. याच जनआंदोलनाअंतर्गत आता कुर्लावासियांनी पोस्टकार्ड आंदोलनाची हाक दिली आहे. मदर डेअरीची जागा डीआरपीपीएलला देण्याचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी या पोस्टकार्डद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली जाणार आहे. शासन निर्णय रद्द करण्याच्या आशयाची पत्रे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठविली जाणार आहेत. धारावी पुनर्विकासाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांनाचेही पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र हे पुनर्वसन धारावीबाहेर केले जाणार असून त्यासाठी डीआरपीपीएलकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. त्यानुसार नुकतीच राज्य सरकारने कुर्ल्यातील मदर डेअरीच्या २१ हेक्टरपैकी ८.५ हेक्टर जागा डीआरपीपीएलला दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. कुर्ल्यातील रहिवाशांनी मात्र ही जागा डीआरपीपीएलला देण्यास विरोध केला आहे. ८.५ हेक्टरच नव्हे तर संपूर्ण २१ हेक्टर जागा डीआरपीपीएल वा इतर कोणाला ही देऊ नये. या जागेवर उद्यान उभारावे अशी मागणी कुर्लावासियांनी केली आहे. डीआरपीपीएलला ८.५ हेक्टर जागा देण्याचा निर्णय रद्द करावा अशीही मागणी त्यांची आहे. या मागणीसाठी आता लोक चळवळीच्या माध्यमातून कुर्लावासिय एकत्र आले असून त्यांनी जनआंदोलन उभारले आहे.

लोक चळवळीच्या माध्यमातून मागील काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. आता याच आंदोलनाचा एक भाग म्हणून सोमवारपासून पोस्टकार्ड आंदोलन सुरू केले जाणार असल्याची माहिती लोक चळवळीचे किरण पैलवान यांनी दिली. डीआरपीपीएलला मदर डेअरीची जागा देण्याचा निर्णय रद्द करावा आणि २१ हेक्टर जागेवर उद्यान विकसित करावे, अशी मागणी या पोस्टकार्डद्वारे केली जाणार आहे. मोठ्या संख्येने पोस्टकार्ड पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले. कुर्लावासियांची मागणी मान्य होईपर्यंत विविध माध्यमातून आंदोलन सुरूच रहाणार असल्याचेही पैलवान यांनी सांगितले.

Previous Post

खेळाडूंना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

Next Post

१७५ कुटुंबाचे उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीत अजूनही वास्तव्य

Next Post
१७५ कुटुंबाचे उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीत अजूनही वास्तव्य

१७५ कुटुंबाचे उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीत अजूनही वास्तव्य

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.