Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद; १५ दिवसांत इतक्या कोटींची कमाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 17, 2026
in मनोरंजन
‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद; १५ दिवसांत इतक्या कोटींची कमाई
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी लढणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा २०२६ या वर्षातील पहिला ‘सुपरहिट’ मराठी चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट २०२६ च्या नवीन वर्षात १ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि आता १५ दिवसांत १५ कोटींचा टप्पा ओलांडताना दिसणार आहे. हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आता १५ दिवसांत १४ कोटी ९० लाखांहून अधिक कमाई केली असल्याचे समजले आहे. अवघ्या २ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर १४ कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक देखील केले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या १५ दिवसांतच भारतात १५ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अनेक कलाकारांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.

मराठी मधील दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने अतिशय संवेदनशील विषयाला मनोरंजनाची जोड देत हा चित्रपट बनवला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेला वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिलेला लढा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनय, अमेय वाघची विनोदी शैली आणि प्राजक्ता कोळीचा मराठी सिनेसृष्टीतील पदार्पण प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरले आहे. चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे आणि सचिन खेडेक, चिन्मयी सुमित या सगळ्यांना उत्तम अभिनय पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या मोठ्या बजेटच्या बॉलीवूड चित्रपटांच्या तुलनेत ‘क्रांतीज्योती विद्यालय’चा उत्तम कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धुरंधर, इक्कीस, अवतार हे बॉलीवूड सिनेमे गाजत असताना. मराठी चित्रपटाने आपला पाया भक्कम ठेवला आहे. आता हा चित्रपट २० कोटींचा टप्पा नक्की पार करेल अशी खात्री आहे.

 

Previous Post

‘जेन झी’ पिढीचा महापालिकेत प्रवेश! अवघ्या २२व्या वर्षी नगरसेवकपदी निवड

Next Post

BPचा त्रास कमी करण्यासाठी रोज रात्री झोपताना करा या ३ पेयांचं सेवन

Next Post
BPचा त्रास कमी करण्यासाठी रोज रात्री झोपताना करा या ३ पेयांचं सेवन

BPचा त्रास कमी करण्यासाठी रोज रात्री झोपताना करा या ३ पेयांचं सेवन

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.