Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 6, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : गॅसचा तुटवडा, महागाईचा तडाखा आणि जगण्यासाठीची झुंज या सगळ्या संकटांच्या छायेत एक हृदयद्रावक वास्तव सध्या समोर येत आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील गरीब महिला चुलीचा आसरा घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे पूर्वांपार चालत आलेलं महिलांचं जीवनमान पाहता आताही गरीब महिलांचं आयुष्य हे चुलीच्या धुरात हरवू पाहात असल्याचे दिसून येत आहे. चुलीसाठी लागणारं साहित्य, लाकूड फाटा गोळा करण्यासाठी महिलांचा आटापिटा दिसून येत आहे. शहरात आधुनिक सुविधा उपलब्ध असल्या तरी समाजाच्या एका मोठ्या घटकाला अजूनही मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. सिलिंडर मिळत नसल्याने आणि वाढत्या किमतींमुळे अनेक कुटुंबांनी पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत सर्वात जास्त हाल होत आहेत ते गरीब आणि वृद्ध नागरिकांचे.

दररोजच्या जगण्याची लढाई लढणाऱ्या एका वृद्ध महिलेची अवस्था या संकटाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. हातात काठी, डोक्यावर लाकडांचा जड भार आणि अंगावर वर्षानुवर्षांची झीज अशा अवस्थेत ही महिला दररोज लाकूड गोळा करताना दिसते. तिच्यासाठी चूल ही केवळ स्वयंपाकाचे साधन नाही, तर जगण्याचा एकमेव आधार बनली आहे. गॅस नसल्यामुळे तिला रोज धुरात बसून चूल पेटवावी लागते आणि त्या धुराचा त्रास सहन करत पोटाची खळगी भरावी लागते. या प्रक्रियेत तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, अंगावर येणारा उष्णतेचा दाह हे तिच्या आयुष्याचा भाग बनले आहे. तरीही पर्याय नसल्यामुळे ती हीच दिनचर्या स्वीकारून जगत आहे. तिच्यासारख्या अनेक महिलांची हीच अवस्था आहे, जिथे आधुनिकतेच्या गप्पांमध्ये त्यांच्या वेदना मात्र कुणालाही दिसत नाहीत. महागाईमुळे गॅस सिलिंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे, तर पुरवठ्याच्या समस्येमुळे अनेकांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही. परिणामी, पुन्हा चुलीचा धूर आणि कष्टमय जीवन याकडे लोक ढकलले जात आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अशा गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याची वस्तुस्थितीही यामुळे समोर येते.

Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

Next Post

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

Next Post
खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

खासगी बसवर सरकारचा डिजिटल 'वॉच'; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.