Lokrakshanay
Friday, June 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 26, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, “२ ऑक्टोबरला सगळंच उघड होणार…” या घोषवाक्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. नाशिकमधील अशोक खरात याच्यावर अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले होते. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत तसेच भीतीचे वातावरण निर्माण करून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी अशोक खरातला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेक छायाचित्रे आणि चलतचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती. काही राजकीय व्यक्तींसोबतची त्याची छायाचित्रेही समोर आल्याने या प्रकरणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती. या संपूर्ण घटनाक्रमावर आधारित कथानक ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, चित्रपट हा वास्तविक घटनांवर आधारित असला तरी त्यातील मांडणी ही चित्रपटाच्या सर्जनशील सादरीकरणाचा भाग असेल.

चित्रपटाच्या टीझरमध्ये या प्रकरणातील गंभीर आणि संवेदनशील पैलूंची झलक दाखवण्यात आली असून, संपूर्ण घटनाक्रम मोठ्या पडद्यावर नेमका कसा उलगडला जाणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. फ्लेमिंगो क्रिएशन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड यांच्या प्रस्तुतीत या चित्रपटाची निर्मिती देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत यांनी केले असून सध्या चित्रीकरण वेगाने सुरू आहे. चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी साकारले आहेत. छायांकनाची जबाबदारी आकाश काकडे यांच्याकडे तर कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर यांनी सांभाळले आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असून, प्रदर्शनानंतर या चित्रपटाला प्रेक्षक आणि समाजमाध्यमांवर कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चित्रपटसृष्टीसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

Next Post

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

Next Post
१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.