वृत्तसंस्था : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २०१० मधील प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्याला दिल्ली उच्च न्यायालयाने सरे़ंडर होण्यासाठी सांगितलं होतं. त्याप्रकरणी आता अभिनेता स्वत: दिल्लीतील तुरूंगामध्ये स्वत: सरेंडर झाला आहे. २०१० साली ५ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या सरेंडरच्या आदेशाखाली अभिनेत्याने काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास स्वत: सरेंडर झाला आहे. तिहाड जेलच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अभिनेता काल सायंकाळी ४ वाजता जेल अधिकाऱ्यांसमोर सरेंडर झाला आहे. न्यायालयाने अभिनेत्याला चेक बाऊन्स प्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये सरेंडर होण्याचे निर्देश दिले होते. २०१० साली राजपालने इंदौरच्या सुरेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीकडून ५ कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र अभिनेत्याने दिलेल्या मुदतीत पैसे परत न दिल्याने सुरेंद्र यांनी यादवच्या मागे तगादा लावला होता. २०१५ साली अभिनेत्याने दिलेला ॲक्सिस बँकेचा चेक सुद्धा बाऊन्स झाला होता. त्यामुळे सिंह यांनी वकीलाकडून अभिनेत्याला नोटीस पाठवली. तरी देखील अभिनेत्याने कर्ज फेडले नाही. यामुळे सिंह यांनी येथील जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने सिंह आणि यादव यांना सामंजस्याने हा वाद सोडवण्याचा अनेकदा सूचना दिल्या. मात्र, यादवने गंभीरपणे न घेता सिंह यांचे कर्ज फेडलेच नाही. दिल्ली उच्च न्यायालयाकडून मिळाल्या माहितीनुसार, राजपाल यादवने न्यायालयाला दिलेले आश्वासन मोडले आणि अद्यापही पैसे दिले नाहीत.
बुधवारी, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने राजपाल यादव यांची आत्मसमर्पण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागण्याची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, अभिनेत्याने त्याच्या याचिकेवर विचार करण्यापूर्वी आधी आत्मसमर्पण करावे. न्यायालयाने नमूद केले की शेवटच्या वेळी जेव्हा त्याने मुंबईत असल्याचे सांगितले तेव्हा त्याला दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. न्यायमूर्ती शर्मा यांनी स्पष्ट केले की याचिका आधीच फेटाळण्यात आली आहे आणि आता त्याला सूट देण्याचे कोणतेही कारण नाही. न्यायालयाने पुढे म्हटले की कायद्याचा आदर करणे आवश्यक आहे आणि कोणत्याही व्यक्तीला, चित्रपट उद्योगाशी संबंधित असला तरी, विशेष सूट देता येत नाही. सुनावणी दरम्यान, राजपाल यादवच्या वकिलाने एका आठवड्याची मुदतवाढ मागितली. यादवने ५० लाख रुपयांची व्यवस्था केली आहे आणि लवकरच ते देतील असा दावा वकिलाने केला. पुराव्यांचा हवाला देत, वकिलाने सांगितले की जर त्याला वेळ मिळाला तर तो पैसे आणेल, अन्यथा त्याची याचिका फेटाळली तर तो सरेंडर होईल. तथापि, न्यायालयाने या प्रकरणी कोणताही युक्तिवाद केला नाही, त्यानंतर अभिनेत्याला ठरलेल्या वेळी तुरुंगात सरेंडर झाला. राजपाल यादवला २०२४ मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण जुने आहे, “अता पता लापता” चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित कर्ज आणि चेक बाउन्सशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. अभिनेत्याने वारंवार पैसे देण्याचे आश्वासन दिले, परंतु न्यायालयाने त्याच्या डिफॉल्टला गांभीर्याने घेतले.

