Lokrakshanay
Sunday, September 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘ईव्हीएमऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राज ठाकरे यांची सर्व विरोधी पक्षांना आंदोलनाची हाक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 26, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
‘ईव्हीएमऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राज ठाकरे यांची सर्व विरोधी पक्षांना आंदोलनाची हाक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणी (SIR) प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत मोठी भूमिका मांडली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये त्यांनी यापुढील सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (EVM) पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत, त्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारावे, असे आवाहन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली असून, एसआयआर प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये, “एसआयआरमध्ये गंभीर घोळ झाल्याचे आरोप समोर येत आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून तिची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्यानंतर नव्याने प्रक्रिया राबवावी,” अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही हीच अधिकृत भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, “यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभे केले पाहिजे. त्यातूनच इतक्या वर्षांच्या सत्तेचे सत्य समोर येईल,” असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर निवडणूक प्रक्रियेबाबतचा राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

२ ऑक्टोबरला राज्यात ‘NO UPI DAY’; यूपीआय शुल्काविरोधात व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी एल्गार

Next Post

अजय देवगणच्या जुहू बंगल्यावर BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस!

Next Post
अजय देवगणच्या जुहू बंगल्यावर BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस!

अजय देवगणच्या जुहू बंगल्यावर BMCची 'स्टॉप वर्क' नोटीस!

BreakingNews

एसटी प्रवासातील सवलतींसाठी आता ‘NCMC कार्ड’ बंधनकारक; १ ऑक्टोबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी

अजय देवगणच्या जुहू बंगल्यावर BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस!

‘ईव्हीएमऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राज ठाकरे यांची सर्व विरोधी पक्षांना आंदोलनाची हाक

२ ऑक्टोबरला राज्यात ‘NO UPI DAY’; यूपीआय शुल्काविरोधात व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी एल्गार

२ ऑक्टोबरला ‘जंतरमंतर २.०’? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपके कडाडले!

Instamartचा इलेक्ट्रिक डिलिव्हरीला वेग; Yulu आणि Yuma Energy सोबत भागीदारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.