Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा मद्यपान करून अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा; मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 7, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा मद्यपान करून अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा; मराठी इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मराठी माणसांना आधी मेहनत करायला शिकवा असं ती त्यात म्हणत होती. ज्यावरुन तिला ट्रोल केलं गेलं, तिच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात मनसेने तक्रार केली. ज्यानंतर तिने हा व्हिडीओ डिलिट केला. तसंच नवा व्हिडीओ पोस्ट करत आपले शब्द मागे घेतले. याच राजश्री मोरेने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाने आपल्याला कशी शिवीगाळ केली हे राजश्री मोरे यात सांगते आहे. तसंच हा मुलगा अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालत होता असंही तिने सांगितलं आहे.

रविवारी रात्री राजश्री मोरेच्या कारचाअपघात झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख मद्यपान करून गाडी चालवत होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेनंतर राजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत तिच्यावर आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येत आहे. यामध्ये तो तिला धमकी देतानाही दिसतोय. “xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग.. मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल”, अशी धमकी त्याने राजश्रीला दिली. व्हिडीओमध्ये तो मुलगा घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशीही वाद घालताना दिसतोय. पोलिसांना कुठलंही सहकार्य करण्यास नकार देतो आणि त्यांच्याशी आक्रमकपणे वागतो हे दिसून येतं आहे. या प्रकरणी राजश्रीने राहिलविरोधात एफआयआर दाखल केली असून त्याची कॉपीसुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. राहील दारुच्या नशेत गाडी चालवत होता आणि वडिलांच्या राजकीय पदावरून धमकी देत होता, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर एफआयआर दाखल केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सतत धमक्या मिळत असल्याचं तिने म्हटलंय. राजश्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Previous Post

मुखमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करणार

Next Post

नैसर्गिक ओढे, नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात पीएमआरडीएने केले गुन्हे दाखल

Next Post
नैसर्गिक ओढे, नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात पीएमआरडीएने केले गुन्हे दाखल

नैसर्गिक ओढे, नाल्यांचा प्रवाह रोखणाऱ्यांविरोधात पीएमआरडीएने केले गुन्हे दाखल

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.