Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ अॅप, शेतीविषयक व योजना विषयक माहिती होणार उपलब्ध

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ अॅप, शेतीविषयक व योजना विषयक माहिती होणार उपलब्ध
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ हे नवीन अॅप सुरु करण्यात आले आहे. “शेतकऱ्याचा डिजिटल मित्र” असे या अॅपविषयी वर्णन केले जाते. आपल्या शेतकरी बांधवांना आता एका अॅप मध्येच शेतीविषयक व योजना विषयक सर्व माहिती उपलब्ध आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती, पिक सल्ला, पिकांसाठी लागणारी खताची मात्रा, किड व रोगाविषयी माहिती तसेच त्यांनी पिकविलेल्या मालाचा बाजारभावही बघता येणार आहे. अगदी एका क्लिकवर शेतीसाठी लागणारी यंत्र अवजारे भाडे तत्त्वावर मिळविण्याकरिता त्यांच्या गावाच्या जवळपास असणारे अवजारे बँकांची माहिती देखील या अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

महाडीबीटीवर असणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती अर्थात त्यातील विविध घटकांकरिता अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे वगैरे या अॅप मध्ये समाविष्ट आहे. ऑनलाईन शेतीशाळा, नवनवीन तंत्रज्ञानाचे व्हिडिओ देखील या अॅपच्या माध्यमातून शेतकरी बघू शकतात. याकरिता शेतकऱ्यांनी मोबाईल प्ले स्टोअरवरून “महाविस्तार एआय” अॅप डाऊनलोड करून घ्यावा. त्यानंतर आपल्या शेतकरी आयडीने लॉगीन करून आपले नाव, गाव, तालुका प्रविष्ट करायचा आहे. ज्यामुळे त्यांची गावनिहाय तालुकानिहाय सर्व माहिती त्यांना उपलब्ध होईल. या अॅपच्या होम पेजवर शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध होईल तसेच नवनवीन गोष्टीविषयी किंवा शेतकरी बांधवांच्या मनात येणारे शंका व त्यांचे विविध प्रश्न अॅपमध्ये असणाऱ्या “मला प्रश्न विचारा” येथे जाऊन आपल्या शंकांचे निरसन करू शकतात, अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीविषयक एक सोबती मित्र आता त्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी “महाविस्तार” अॅप प्ले स्टोअर मधून उपलब्ध करून घेवून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्यावरील माहितीचा लाभ घ्यावा. तसेच या अॅपविषयी अधिक माहितीकरीता जवळच्या तालुका तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

Previous Post

ठाण्यात बोगस माथाडींचा सुळसुळाट

Next Post

नवरात्रौत्सवानिमित्त ठाणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष

Next Post
नवरात्रौत्सवानिमित्त ठाणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष

नवरात्रौत्सवानिमित्त ठाणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.