Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारणार इंडिया पोस्टचे लॉजिस्टिक्स हब

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 14, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारणार इंडिया पोस्टचे लॉजिस्टिक्स हब
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : देशातील टपाल सेवेमध्ये वेगाने आधुनिकीकरणाची प्रक्रिया आत्मसात करणाऱ्या इंडिया पोस्टच्यावतीने आता लॉजिस्टिक्स क्षमतेत मोठी झेप घेतली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) ने नव्याने उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) नजीक सुमारे सहा एकर जमिनीचा तुकडा इंडिया पोस्टला देण्यात आला आहे. या जमिनीवर अत्याधुनिक लॉजिस्टिक्स हब उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील उलवे येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जे दक्षिण मुंबईपासून सुमारे ३७ किमी अंतरावर आहे. देशाच्या प्रगतीत तसेच शहराच्या वाढीत विमानतळे ही मुख्य केंद्र ठरत असतात. यामुळे नवी मुंबई परिसरात निवासी प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क, व्यावसायिक केंद्रे, हॉटेल्स आणि इतर सेवांची उभारणी सुरू झाली आहे. दरम्यान जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए) कडून इंडिया पोस्टला सहा एकर जमिनीवर देण्यात आली आहे. यावर इंडिया पोस्टचे लॉजिस्टिक हब उभे राहणार आहे. लॉजिस्टिक हब या प्रकल्पाचा उद्देश देशभरातील पार्सल्सचे वितरण अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवणे आहे. विशेषतः लघुउद्योग, शिल्पकार, खेळणी निर्माते, मातीचे कारागीर, लोहार आणि बांधकाम कामगार यांना त्यांचे उत्पादन सहजपणे वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. इंडिया पोस्ट आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक साखळी अधिक सक्षम करणार आहे. विमानतळाच्या अगदी जवळ या हबची उभारणी होत असल्याने, देशभरातील लघुउद्योग, शिल्पकार आणि कारागीर यांना त्यांच्या उत्पादनांच्या जलद वाहतुकीचा मोठा फायदा होणार आहे.

Previous Post

ठाण्यात महापालिकेच्या कारवाईविरोधात आदिवासी कुटुंबांचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्वसनाची मागणी

Next Post

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Next Post
फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.