Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवली आजदे गावाजवळील इमारतींच्या मोकळ्या जागेत बेकायदा बांधकाम

गेल्या पंधरा दिवसापूर्वी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील टिळकनगर शाळेसमोरील एक बेकायदा इमारत सील करण्याचे नाटक केले आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 3, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
डोंबिवली आजदे गावाजवळील इमारतींच्या मोकळ्या जागेत बेकायदा बांधकाम
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी हद्दीतील घरडा सर्कल जवळील आजदे गावात दत्त मंदिरासमोरील जयराम गायकर इमारतीच्या पाठीमागील बाजूस इमारतींच्या मोकळ्या जागेत आटोपशीर जागेत घाईघाईने बेकायदा इमारत उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. या बांधकामाला विरोध करणाऱ्या इमारतीमधील नागरिकांना भूमाफियांनी दमदाटी केली आहे. यासंदर्भात पालिकेच्या ई प्रभागात, एमआयडीसी कार्यालयात तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. उलट अधिकाऱ्यांकडून आपली नावे भूमाफियांना सांंगितली जातील या भीतीने कोणीही नागरिक स्वताचे नाव उघड करण्यास तयार नाही. गेल्या पंधरा दिवसापूर्वी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील टिळकनगर शाळेसमोरील एक बेकायदा इमारत सील करण्याचे नाटक केले आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

पालिका, एमआयडीसी अधिकारी आपली जबाबदारी झटकून या बेकायदा बांधकामांना अभय देतात. त्यामुळे भूमाफियांनी बेकायदा बांधकाम करण्यास बळ मिळत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. जयराम गायकर इमारतीच्या पाठीमागील बाजूस दोन ते तीन इमारतींच्या मोकळ्या जागेत, गटार, मल, जलनिस्सारण वाहिन्या गेलेल्या भागातून भूमाफियांनी इमारतीला कोणतेही सामासिक अंतर न ठेवता, इतर इमारतींच्या घरात अंधार पसरेल, सांडपाणी वाहून जाण्यासाठी जागा न ठेवता, अशा पध्दतीने आजदे गावात दत्तमंदिरासमोरील भागात बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे. या बेकायदा इमारतीच्या बांधकामासाठी पालिकेच्या जलवाहिनीतून चोरून पाणी पुरवठा वापरला जात आहे. या नवीन बांधकामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अरूंद बोळातून जावे लागते. या भागात काही दुर्घटना घडली तर तेथे रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन जाणार नाही, असे तक्रारदारांनी सांगितले. अमुदान कंपनी स्फोटानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, औदयोगिक सुरक्षा, कामगार विभाग, एमआयडीसीचे अधिकारी डोंबिवली एमआयडीसी भागात नियमित फिरतात. त्यांना आजदे, सागर्ली, एमआयडीसी भागातील बेकायदा इमारतींची बांधकामे दिसत नाहीत का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. या भागातील बहुतांशी बेकायदा बांधकामे राजकीय पाठबळ असलेल्या भूमाफियांची आहेत. अधिक माहितीसाठी एमआयडीसी अधिकाऱ्यांना संपर्क केला, त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही. पालिका अधिकाऱ्याने ही जागा एमआयडीसी हद्दीत आहे त्यांनी कारवाई करावी असे सांगितले.

Previous Post

राज्यभरात नवीन कायद्याअंतर्गत २४४ गुन्हे दाखल

Next Post

मध्य रेल्वेने रेल्वेच्या अलार्म चेनचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर केली कारवाई; प्रवाशांकडून ६३.२१ लाखांची दंडवसुली

Next Post
मध्य रेल्वेने रेल्वेच्या अलार्म चेनचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर केली कारवाई; प्रवाशांकडून ६३.२१ लाखांची दंडवसुली

मध्य रेल्वेने रेल्वेच्या अलार्म चेनचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर केली कारवाई; प्रवाशांकडून ६३.२१ लाखांची दंडवसुली

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.